पिंपरी-चिंचवड

घरबसल्या भरा, झोपडपट्टी सेवाकर

CD

पिंपरी, ता. १० ः महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागामार्फत आता सेवाकर घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहे. त्यासाठी क्युआर कोड उपलब्ध असून सहज व सुरक्षितपणे सेवाकर भरणे शक्य होईल. त्यामुळे नागरिकांचा वेळ, श्रम वाचणार असून डिजिटल सेवांकडे महापालिकेचा आणखी एक प्रभावी टप्पा पूर्ण झाला आहे.
झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागामार्फत राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत ‘सारथी सोनचीरैया’ उपक्रमात शहर उपजीविका केंद्राशी संलग्न व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागाअंतर्गत कार्यरत महिला बचत गटांच्या प्रतिनिधींमार्फत झोपडपट्टीवासियांना सेवाकर बिलांचे वितरण करण्यात आले आहे. बिल भरण्याची ऑनलाइन सुविधाही सुरू आहे. सेवाकर बिलाच्या खालच्या उजव्या बाजूस क्युआर कोड दिला आहे. हा क्युआर कोड स्कॅन करून बिलाचा भरणा करता येणार आहे. या सुविधेचा लाभ घेऊन सेवाकर भरावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

असा भरा ऑनलाइन सेवाकर
- ज्या नागरिकांना महापालिकेकडून बिल मिळाले आहे, ते बिलाचा भरणा घरबसल्या ऑनलाइन करू शकतात
- बिलाच्या खालील उजव्या बाजूस दिलेला क्युआर कोड मोबाइलद्वारे स्कॅन करावा
- क्युआर कोड स्कॅन केल्यानंतर तुमचे नाव व बिलासंबंधी इतर संबंधित माहिती स्क्रीनवर दिसेल, माहिती तपासून घ्यावी
- माहिती योग्य असल्याची खात्री झाल्यानंतर त्याखालील ‘Pay Bill Here’ या बटणावर क्लिक करावे
- यूपीआय, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बॅंकिंग, डीजिटल वॉलेट यांपैकी कोणत्याही पर्यायाचा वापर करून बिलाचा भरणा पूर्ण करावा

सेवाकर बिलावर दिलेल्या क्युआर कोडद्वारे काही सेकंदांत ऑनलाइन भरणा करता येणार आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून बिलांचे वितरण करून नागरिकांपर्यंत ही सुविधा प्रभावीपणे पोहोचविण्यात आली आहे. सर्व लाभार्थ्यांनी वेळेत सेवाकर भरणा करावा.
- अण्णा बोदडे, उपायुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोण होती २३ वर्षीय नंदिनी? घरात आढळला मृतदेह, आपच्या तिकिटावर लढलेली निवडणूक

अखेर 'मुरांबा' निरोप घेणार; शशांक केतकरने शेअर केले फोटो, सांगितलं कसा होणार मालिकेचा शेवट

Latest Marathi News Live Update : नसरापूर हत्या-बलात्कार प्रकरण! न्यायालयीन सुनावणीनंतर पोलीस अधीक्षक आणि सरकारी वकिलांची संयुक्त पत्रकार परिषद

Ayodhya Ram Temple Threat : अयोध्येतील राम मंदिर बॉम्बने उडवण्याचा कट? 20 वर्षीय दहशतवादी सुहैलची पोलिसांसमोर धक्कादायक कबुली, 'मेनन अँड जित्तू -333' काय आहे?

Hasan Mushrif Gokul Milk : गोकुळ दूध संघात हसन मुश्रीफांनी ताकद दाखवली, २ हजार ठराव केले दाखल; सगळ्यांना पर्यटनासाठी नेणार, हॉटेल पॉलिटिक्स सुरू

SCROLL FOR NEXT