सोमाटणे, ता. ११ ः महाशिवरात्रीनिमित्त घोरवडेश्वर येथे कीर्तन महोत्सवाला प्रारंभ झाला. घोरवडेश्वर पायथा येथे घोरवडेश्वर विकास प्रतिष्ठान, घोरवडेश्वर प्रासादिक दिंडी व घोरवडेश्वर अखंड हरिनाम सप्ताह सोहळा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवानिमित्त रोज पहाटे काकडा आरती, गाथा पारायण, भजन, प्रवचन, हरिपाठ, आरती, महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहे. या काळात बापूसाहेब महाराज मोरे, रामकृष्ण महाराज लहवितकर, एकनाथ महाराज सदगीर, चैतन्य महाराज निंबोळे, केशव महाराज मुळीक, अनिल महाराज पाटील आदींची कीर्तन होणार आहेत. चौदा फेब्रुवारी रोजी सकाळी चंद्रकांत महाराज वांजळे यांच्या काल्याच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता होणार आहे.
------------------------------------------------------------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.