पिंपरी-चिंचवड

ग्रामीण साहित्यात समाजाला शहाणे करण्याची ताकद : पवार

CD

पिंपरी, ता.१५ ः ‘‘आजच्या विज्ञानयुगात ग्रामसंस्कृती बदलत आहे. गावपण जपताना माणसाने शहाणे होणे गरजेचे आहे. आजच्या वेदनेचा आक्रोश आपल्याला जाणावा लागेल. गावगाड्यातील अनुभवांवर आधारित ग्रामीण साहित्यात समाजाला शहाणे करण्याची ताकद आहे.’’, असे प्रतिपादन माजी आमदार उल्हास पवार यांनी व्यक्त केले.
आकुर्डी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर सभागृहात सकाळ प्रकाशन प्रकाशित आणि दादाभाऊ गावडे लिखित ‘गांव तसं चांगलं’ या पुस्तकाचे प्रकाशन माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. चंद्रकांत वांजळे, प्रा. तुकाराम पाटील, अरुण बोऱ्हाडे, राजेंद्र घावटे, संदीप तापकीर, राम गावडे आदी यावेळी उपस्थित होते.
डॉ. सबनीस म्हणाले, ‘‘माती, नाती आणि संस्कृतीचा लळा काळजामध्ये ठसतो. काळजात रुजलेल्या आठवणी सदैव टिकतात. गावगाड्यात जाती-पाती पलीकडे जाऊन समाज जपला जात असे. हरवत चाललेला गाव परत जवळ यावा. गावांशी नाळ जोपासत प्रत्येक गाव आदर्श होण्यासाठी त्या त्या गावाच्या सुपुत्रांनी प्रयत्न करावा.’’
दादाभाऊ गावडे यांनी मनोगत व्यक्त केले. सकाळ प्रकाशनाच्या अमृता देसर्डा यांनी प्रास्ताविक केले. संतोष घुले यांनी सूत्रसंचालन केले. सतीश गावडे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Us War: आता काय बिनसलं? होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद; कारण सांगत इराणचा कठोर निर्णय

RCB vs DC: फॉर्ममध्ये असलेल्या बंगळुरूविरुद्ध अक्षर पटेलने जिंकला टॉस! बर्थडे बॉय केएल राहुलकडे असणार लक्ष; पाहा Playing XI

MPSC Success : दगड फोडणाऱ्याची मुलगी झाली अधिकारी! लोणीच्या मोहिनीची महसूल सहाय्यकपदावर झेप; तिचा संघर्ष वाचून डोळ्यात येईल पाणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री साडे आठ वाजता संबोधित करणार, काय बोलणार?

Sahil Shaikh Story : बापानं गवंडी काम केलं, तर आईनं शेती! लेकानं जिद्दीच्या जोरावर मिळवली खाकी; वाचा पाचवेळा अपयश पचवलेल्या साहिल शेखची प्रेरणादायी यशोगाथा

SCROLL FOR NEXT