पिंपरी-चिंचवड

मल्याळी बांधवांनी साजरा केला ‘विशू’ श्रीकृष्ण मंदिरात वार्षिक महोत्सव

CD

पिंपरी, ता. १६ ः निगडी भक्ती-शक्ती येथे श्रीकृष्ण मंदिरामध्ये वार्षिक महोत्सवात मल्याळी नवीन वर्षारंभ म्हणजेच ‘विशू’ हा सण साजरा झाला. समृद्धी आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक असलेला हा सण पारंपरिक पोशाख, कनी दर्शन, स्वादिष्ट ‘साध्या’ आणि फटाक्यांच्या आतषबाजीने साजरा केला. वडीलधाऱ्यांकडून लहानांना ‘विशू कैनेट्टम’ देण्याची परंपरा पाळण्यात आली. यानिमित्ताने मल्याळी बांधवांनी श्रीकृष्ण मंदिरामध्ये देवदर्शनासाठी गर्दी केली होती. एकमेकांना शुभेच्छा देत आपल्या घरोघरी ‘विशूकनी’ म्हणजेच फुल फळांची आरास करून भगवान श्रीकृष्ण मूर्तीची पूजा केली. दुपारी केळीच्या पानावर विशू साध्याचा आनंद लुटला.
श्रीकृष्ण चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित केले होते. मंदिरात सकाळी जागरण, निर्मल्य दर्शन, अभिषेक, महागणपती होम, उषा पूजा, मुळा पूजा, पंदीर्थी पुज, उच्च पूजा श्री भूताबेली असे धार्मिक विधी झाले. दुपारी सुमारे १००० भाविकांनी अन्नदानाचा लाभ घेतला. सायंकाळी दीप आराधना भगवती सेवा, जप पूजा, भागवत नारायण आशा विधी झाल्या. निलांबरी डान्स ग्रुप प्रस्तुत गुरू सुजा दिनकर आणि सहकारी कलाकारांनी नृत्यसंध्या हा पारंपारिक नृत्याचा कार्यक्रम सादर केला. फाउंडेशनचे अध्यक्ष सी. पी. शशीधरण, सचिव पी. एम. व्ही. कैलम, खजिनदार निशा अनिल यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विधान परिषदेसाठी भाजपची ११ उमेदवारांची यादी जाहीर; प्राजक्त तनपुरेंनाही संधी, राजकीय चर्चांना उधाण

Dhananjay Deshmukh: आरोपांचा 'फुसका बार'! धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, पण सीसीटीव्हीने उघड केला धनंजय देशमुखांचा बनाव

Suman Kalyanpur: भारतीय संगीतविश्वातील सुवर्णपान हरपले! ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन; संगीतविश्व शोकमग्न

IPL 2026 Final, RCB vs GT live: गतविजेत्या बंगळुरूने इतिहास रचला! मुंबई इंडियन्सचा १३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, बनला पहिला संघ...

Education News: शरद शिंदे यांना अर्थशास्त्रात पीएच.डी.; नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पावरील संशोधनाला विद्यापीठाची मान्यता

SCROLL FOR NEXT