अपहार प्रकरणी तिघांवर गुन्हा
पिंपरी : भोसरी येथील दुकानातील कामगाराने त्याच्या साथीदारांसह मिळून ४१ लाख ८२ हजार ६१४ रुपये किमतीच्या मालाचा अपहार केला.
या प्रकरणी अमित दरक (रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार राजेंद्र कासट (रा. आळंदी रस्ता, दिघी), संदीप सदाशिव (आळंदी रस्ता, भोसरी) आणि रिक्षा चालक बाबूराव बोराडे यांच्यावर गुन्हा दाखल केला. आरोपी राजेंद्र हा फिर्यादीच्या दुकानात नोकरीस असताना त्याने संदीप आणि बाबूराव यांच्याशी संगनमत करून दुकानातील केमिकल लिक्विड आणि पावडर परस्पर विकला. या विक्रीतून जमा झालेली रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरून फसवणूक केली.
तरुणावर कोयत्याने वार करून माजवली दहशत
पिंपरी : चिखलीतील टॉवर लाइन येथे रस्त्यात उभ्या असलेल्या टोळक्याला बाजूला होण्यासाठी हॉर्न वाजवल्याचा राग आल्याने चौघांनी मिळून तरुणाला मारहाण करून कोयत्याने वार केले. तसेच परिसरात दहशत माजवली.
या प्रकरणी आर्यन चव्हाण (रा. चिखली) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चार अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केला. फिर्यादी त्यांच्या मित्रासोबत दुचाकीवरून जात असताना त्यांनी रस्त्यात थांबलेल्या मुलांना बाजूला होण्यास सांगितले. याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादीवर कोयत्याने वार केले.
१४ किलो गांजा जप्त; एकाला अटक
पिंपरी : सांगवी येथील पॉवर हाऊस येथे सांगवी पोलिसांनी केलेल्या कारवाईत गणेश चव्हाण (रा. गणेगाव खालसा, ता. शिरूर, पुणे) याच्याकडून १४ किलो गांजा जप्त केला. त्याला हा गांजा विक्रीसाठी विनोद झरे (रा. राहू पाठेठाण, दौंड) याने दिल्याचे चव्हाण याने सांगितले.
जुगार प्रकरणी सहा जणांवर गुन्हा
पिंपरी : भोसरीतील सद्गुरूनगर येथे मोकळ्या जागेत जुगार खेळणाऱ्या सहा जणांवर भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
राजाभाऊ पालकर, सुभाष राठोड, अभय ओव्हाळ, अकबर शेख, रामदास गायकवाड, देवा राठोड (सर्व रा. भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या कारवाईत जुगाराचे साहित्य, मोबाईल, दुचाकी, चारचाकी आणि रोख रक्कम असा एकूण ४ लाख १६ हजार ८९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
अल्पवयीन मुलाकडून पिस्तूल जप्त
पिंपरी : बेकायदारित्या पिस्तूल बाळगणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला निगडीत पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक पिस्तूल व दोन काडतूस जप्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.