पिंपरी-चिंचवड

‘अभिप्राय २०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

CD

पिंपरी, ता. १८ : रोटरॅक्ट क्लब ऑफ पिंपरी आणि रोटरी क्लब ऑफ पिंपरी यांच्या वतीने आयोजित ‘अभिप्राय २०२६’ या जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
स्पर्धेत एकूण २८ संघांनी सहभाग नोंदवला. प्रत्येक संघात एक रोटेरियन आणि दोन रोटरॅक्टर्सचा समावेश होता. आयक्यू स्प्रिंट, पिक्चर परफेक्ट ॲनालिसिस आणि वादविवाद अशा तीन फेऱ्यांमधून ही स्पर्धा पार पडली. दोनशेहून अधिक उपस्थितांच्या साक्षीने कार्यक्रम उत्साहात रंगला. पुणे, पनवेल, खोपोली आणि रायगड येथील स्पर्धकांनी सहभाग घेतला. वेळी जिल्हा रोटरॅक्ट प्रतिनिधी रोटरॅक्टर द्विजेश नाशिक्कर, जिल्हा महासचिव रोटरॅक्टर अथर्व पाटील तसेच माजी जिल्हा रोटरॅक्ट प्रतिनिधी रोटरॅक्टर अक्षय मोरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेतृत्व इव्हेंट चेअरपर्सन शुभम राऊत यांनी केले. अध्यक्ष वंश चावला आणि सचिव स्वस्ती राय यांनी नियोजन केले. रोटरी क्लब ऑफ पिंपरीचे अध्यक्ष आनंद संपत आणि सचिव रोहन रोकडे यांचे मार्गदर्शन लाभले. नियोजित अध्यक्ष बाबा भापकर यांनी आभार मानले. या उपक्रमास फिनोव्हेटर्स सर्व्हिसेस आणि सीएसजे व्हेंचर्स यांचे विशेष सहकार्य लाभले. एकूणच ‘अभिप्राय २०२६’ हा कार्यक्रम ज्ञान, विश्लेषण आणि विचारमंथन यांचा प्रभावी संगम ठरला असून रोटरी-रोटरॅक्टमधील बंध अधिक दृढ करणारा ठरला.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyan Bharatam Mission: ‘ज्ञानभारतम्’ मोहिमेतून जपली जाणार भारताची ज्ञानपरंपरा; संग्राहकांकडील एक कोटी हस्तलिखितांचा शोध घेणार, मौल्यवान वारसा होणार डिजिटल

Messi Vs Ronaldo: मेस्सीने विश्वचषक जिंकला, आता रोनाल्डोची पाळी? फुटबॉल चाहत्यांमध्ये रंगली नवी चर्चा

Buldhana: खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी बुलडाण्यात दाखल; आ. गायकवाड यांची प्रत्यक्ष पाहणी; पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन

Jejuri Temple Incident : जेजुरी गडावर धक्कादायक घटना! भाविकांकडून पुजाऱ्याला मारहाण, नेमकं काय घडलं?

Chhatrapati Sambhajinagar: कृषी पदवीच्या थेट द्वितीय वर्ष प्रवेशास सुरवात; राज्यातील चारही कृषी विद्यापीठांत शिक्षणाची संधी; १२ जूनपर्यंत करता येणार अर्ज

SCROLL FOR NEXT