वाढत्या वसाहतींना एटीएम सुविधा अपुरी
वाकड येथील टीप टॉप इंटरनॅशनल हॉटेलच्या मागील भागात निवासी सोसायट्या विकसित झाल्या आहेत. तरी या परिसरात एटीएम मशीनची सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. दैनंदिन व्यवहारांसाठी रोख रक्कम काढण्यासाठी नागरिकांना भुजबळ चौकापर्यंत जावे लागते. आपत्कालीन परिस्थितीत रोख रक्कम मिळवणे अधिकच कठीण बनते. ऑनलाइन व्यवहार वाढले असले तरी अनेक ठिकाणी अजूनही रोख रकमेची गरज असते. अशा वेळी एटीएम मशीन नसल्यामुळे गैरसोय होते. प्रशासन आणि बँकांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन उपाययोजना करावी.
- प्रवीण महेशकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.