पिंपरी-चिंचवड

ग्रामदैवत श्री मुंजोबा महाराज यात्रा उत्साहात

CD

पिंपळे सौदागर, ता. १८ ः पिंपळे सौदागरचे ग्रामदैवत श्री मुंजोबा महाराज यांचा वार्षिक उत्सव शनिवारी (ता. १९) अपार श्रद्धा व भक्तिभावाने जल्लोषात साजरा करण्यात आला. फुलांची उधळण करत भाविकांनी मुंजोबा महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले. देवाला नैवेद्य अर्पण करून व श्रीफळ फोडून भाविकांनी साकडे घातले.
उत्सव समिती व समस्त पिंपळे सौदागर ग्रामस्थ यांच्या संयुक्त संयोजनातून यंदाही विविध धार्मिक कार्यक्रम, ढोल लेझीम स्पर्धा, भव्य पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. सोहळ्याची सुरुवात शनिवारी पहाटे सहा वाजता श्री मुंजोबा महाराज यांच्या महापूजा व अभिषेकाने झाली. सकाळी ८ वाजता माजी नगरसेवक नाना काटे, शहर उत्सव समिती अध्यक्ष संतोष काटे, पालखी समिती अध्यक्ष विलास काटे, विजय भिसे, बाळासाहेब कुंजीर, विजू काटे, मानसिंग काटे, नंदकुमार काटे व ग्रामस्थ यांच्या हस्ते पिंपळे सौदागर येथील सर्व मंदिर व देवांना पान फूल करण्यात आले.
पिंपळे सौदागर येथील विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ, सत्यभामा भजनी मंडळ, ज्ञानाई भजनी मंडळ, गुरुमाऊली भजनी मंडळ यांच्या सुस्वर भजनी वाणीने दुपारी भाविकांना आध्यात्मिक आनंद दिला. श्री मुंजोबा महाराज मंदिरापासून सायंकाळी साडेपाच वाजता श्री मुंजोबा महाराज पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली. ढोल - लेझीम पारंपरिक वाद्ये वाजवीत पालखी पुन्हा मंदिरात मोठ्या जल्लोषात परत आणण्यात आली.

गौतमी पाटील हिचा कार्यक्रम
उत्सवाच्या निमित्त नृत्यांगना गौतमी पाटील हिचा ‘नादापुढे सर्व बाद’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला. त्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ग्रामस्थ आणि उत्सव समितीच्या कार्यकारिणी सदस्य यावेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs DC Live: टीम डेव्हिडचा पराक्रम, SIX पाहून भारी होती विराटची रिअ‍ॅक्शन; पण, कृणाल पांड्या का संतापला? Video Viral

TCS प्रकरणानंतर आणखी एक धक्कादायक घटना! तुळशी माळ काढून महिलेला दारू-सिगारेट पाजली; नंतर धमकी देत धर्मांतर अन् अत्याचार

आयुष्यात काही तरी कमी पडतंय... मराठमोळ्या अभिनेत्रीची इंस्टापोस्ट व्हायरल, मोठा निर्णय घेत म्हणाली-

RCB vs DC Live: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या वाघांची 'शेळी' झाली! दिल्ली कॅपिटल्सने भन्नाट गोलंदाजी केली; दोनशेपार जाणारा संघ ढेपाळला

Latest Marathi News Live Update: अधिसेविकेकडून महिला कर्मचाऱ्याला कथित मारहाण; धुळे जिल्हा रुग्णालयात नर्सकडून आंदोलन

SCROLL FOR NEXT