पिंपरी-चिंचवड

धंदा करायचाय? मग हप्ता द्या

CD

पिंपरी, ता. १९ : ‘आम्ही इथले भाई आहोत, धंदा करायचा असेल तर हप्ता द्यावा लागेल,’ अशाप्रकारे दुकानदारांना धमकी देत हप्ता मागण्याचे प्रकार शहरात घडत आहेत. किराणा, हॉटेल, पानटपरी, बांधकाम साहित्य, मोबाईल दुकाने अशा विविध व्यवसायांना ‘लक्ष्य’ करत टोळक्यांकडून वसुली केली जाते. विशेष म्हणजे, नव्याने सुरू होणाऱ्या दुकानांवर आणि एकटे व्यवसाय करणाऱ्यांवर गुन्हेगारांचे अधिक लक्ष असते. हप्ता न दिल्यास धमकी देण्यासह जीवघेणा हल्ला करण्यापर्यंत मजल जात असून, शहरातील विविध पोलिस ठाण्यांत अशा काही घटनांची नोंदही झाली आहे.
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत पिंपरी, चिंचवड, भोसरी, तळेगाव, चाकण हा औद्योगिक भाग येतो. येथे मोठ्या प्रमाणात कंपन्या असून, कामगारवर्गही मोठा आहे. ठिकठिकाणी विविध प्रकारचे व्यावसायिक आहेत. दरम्यान, पथारीवाले, दुकानदार, प्रवासी वाहतूक करणारे वाहनचालक व इतर व्यावसायिक, उद्योजकांकडून काही गुंड पैसे उकळत असल्याच्या घटना घडत आहेत. फुकटचा पैसा मिळत असल्याने हे गुन्हेगार सुसाट सुटले आहेत.

हे आवश्यक
- संवेदनशील भागांत पोलिस गस्त वाढवणे
- सामूहिक तक्रारी नोंदवणे
- स्थानिक पातळीवर पोलिस-व्यापारी बैठकांचे आयोजन करणे
- सीसीटीव्ही आणि डिजिटल पेमेंटची नोंद ठेवणे
- संशयास्पद हालचाली त्वरित पोलिसांच्या निदर्शनास आणणे

कारणे
- जलद पैसे कमावण्याची वाढती प्रवृत्ती
- भीतीमुळे अनेकजण तक्रार नोंदवत नाहीत
- एकदा पैसे दिल्यास गुन्हेगारांचे मनोबल वाढते

कारवाई व शिक्षा
- हप्तेखोरी, धमकी आणि खंडणी हे गंभीर गुन्हे मानले जातात
- खंडणी वसुलीप्रकरणी कठोर कायदेशीर शिक्षा होऊ शकते
- गुन्हेगारी टोळ्यांवर संघटित गुन्हेगारीविरोधी कायदे लागू होऊ शकतात
- दोषी आढळल्यास दीर्घकालीन तुरुंगवासाची शिक्षा होण्याची तरतूद आहे

‘‘जबरदस्तीने पैसे वसूल करणाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला जात आहे. असे प्रकार कुठे घडत असल्यास पोलिसात तक्रार द्यावी. संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.
- डॉ. शिवाजी पवार, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा

घटनांची नोंद :
- २८ जानेवारी : भोसरीतील लांडेवाडी येथे पानटपरी चालवणाऱ्या महिलेकडून दरमहा ५०० रुपयांचा हप्ता मागत जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी उकळल्याची घटना.
- २६ जानेवारी : रावेत येथे बांधकाम साइटवर काम करणाऱ्या मजुरांना ‘आम्ही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहोत’ अशी धमकी देत खंडणी मागितली.
- २८ फेब्रुवारी : पिंपरी सौदागर येथे केकचे पैसे मागितल्याच्या रागातून दुकानात दहशत माजवत दोन हजार रुपये हिसकावले. कोयत्याचा धाक दाखवत तिघांनी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Record Broken! पंजाब किंग्सने नोंदवली IPL 2026 मधील सर्वोच्च धावसंख्या; प्रियांश आर्य, कूपर कॉनलीसह सारेच लखनौच्या गोलंदाजांवर तुटून पडले...

Latur Missing Kids Case: लातूर हादरलं! दोन चुलत भावंडं बेपत्ता; सहा वर्षीय देवांशचा मृतदेह सापडला, साईचरणचा अद्याप शोध सुरू

PBKS vs LSG Live: १२ चौकार, १६ षटकार... प्रियांश आर्य, कूपर कॉनली यांचे शतक थोडक्यात हुकले, संजीव गोएंका यांनी मानले देवाचे आभार...

PBKS vs LSG Live: मॅच फिरली... रिषभ पंतची 'चूक' महागात पडतेय; मिचेल मार्शचं ऐकलं नाही, आता भोगा कर्माची फळं... फलंदाज धु धु धूतायेत

रहस्य, थरार आणि अंधश्रद्धेची प्रभावी गुंफण, कसा आहे पूजा सावंतचा ‘सालबर्डी?

SCROLL FOR NEXT