पिंपरी-चिंचवड

शहरातील गुन्हेगारी विषयक बातम्या

CD

दोन पिस्तूल जप्त; तिघांना अटक
पिंपरी : देहूरोड व रावेत येथे पोलिसांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईत दोन बेकायदा पिस्तूल जप्त करून तिघांना अटक केली.
देहूरोड येथील एमबी कॅम्पकडे जाणाऱ्या रस्त्यावर केलेल्या कारवाईत वीर डूलगज (रा. पारशी चाळ, देहूरोड) याला अटक केली. त्याच्याकडून ५२ हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल व दोन काडतूस जप्त केले. तर दुसरी कारवाई रावेतमधील पंचशील चौक येथे गुन्हे शाखेच्या गुंड विरोधी पथकाने केली. यात आशिष भालेराव (रा. साईनगर, देहूरोड), शुभम (किट्टू) गायकवाड (रा. किवळे गावठाण) यांना अटक केली असून सनी सिंग (रा. उमरठी, मध्य प्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींकडून एक पिस्तूल व दोन काडतूस जप्त केले.

विरुद्ध दिशेने रिक्षा चालविणाऱ्या चालकावर गुन्हा
पिंपरी : विरुद्ध दिशेने रिक्षा चालविणारा रिक्षा चालक बाबासाहेब सोळंके याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या आरोपीने हिंजवडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील एसबीआय बॅंकेसमोरील रस्त्याने विरुद्ध दिशेने रिक्षा चालविली.

अल्‍पवयीन मुलाकडून पिस्तूल जप्त
पिंपरी : पिंपरीतील मोरवाडी परिसरात बेकायदारित्या पिस्तूल बाळगणाऱ्या एका अल्‍पवयीन मुलावर संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. एका १७ वर्षीय मुलाकडे पिस्तूल असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली. त्‍यानुसार पोलिसांनी त्‍याला ताब्यात घेत त्‍याच्‍याकडून ५० हजार रुपये किमतीचे पिस्तूल जप्त केले.

जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा
पिंपरी : काळेवाडी फाट्याजवळील मोकळ्या जागेत जुगार खेळणाऱ्या पाच जणांवर काळेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. किसन निरवणे, काजी श्रेष्ठ, मेघराज आर्यन, गणेश शर्मा, महादेव सानप अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या कारवाईत गुन्हे शाखा युनिटच्या पथकाने ९ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

तडीपार गुंडाला कोयत्यासह अटक
पिंपरी : जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेले असतानाही शहरात आलेल्या शुभम गायकवाड (रा. गांधीनगर, पिंपरी) या तडीपार गुंडाला संत तुकारामनगर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक कोयता जप्त केला.

पिस्तूल बाळगणाऱ्या एकाला अटक
पिंपरी : देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या एकाला पोलिसांनी कासारवाडी येथून अटक केली.
सलीम पटेल (रा. कासारवाडी) असे अटक केलेल्‍या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Record Broken! पंजाब किंग्सने नोंदवली IPL 2026 मधील सर्वोच्च धावसंख्या; प्रियांश आर्य, कूपर कॉनलीसह सारेच लखनौच्या गोलंदाजांवर तुटून पडले...

Latur Missing Kids Case: लातूर हादरलं! दोन चुलत भावंडं बेपत्ता; सहा वर्षीय देवांशचा मृतदेह सापडला, साईचरणचा अद्याप शोध सुरू

PBKS vs LSG Live: १२ चौकार, १६ षटकार... प्रियांश आर्य, कूपर कॉनली यांचे शतक थोडक्यात हुकले, संजीव गोएंका यांनी मानले देवाचे आभार...

PBKS vs LSG Live: मॅच फिरली... रिषभ पंतची 'चूक' महागात पडतेय; मिचेल मार्शचं ऐकलं नाही, आता भोगा कर्माची फळं... फलंदाज धु धु धूतायेत

रहस्य, थरार आणि अंधश्रद्धेची प्रभावी गुंफण, कसा आहे पूजा सावंतचा ‘सालबर्डी?

SCROLL FOR NEXT