पिंपरी-चिंचवड

केवळ ३० टक्के ‘आरटीई’ अर्जांची पडताळणी

CD

पिंपरी, ता.२० ः प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे गेल्या आठ दिवसांपासून आरटीई प्रवेश प्रक्रिया संथगतीने सुरू असून आतापर्यंत केवळ ३० टक्के अर्जांचा निपटारा झाल्याचे दिसून आला आहे. दोन केंद्रांवर फक्त एक हजार १९४ अर्जाची पडताळणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, ३० एप्रिलपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
आकुर्डीतील कै. फकीरभाई पानसरे उर्दू शाळेत आरटीई प्रवेश प्रक्रियेदरम्यान कागदपत्र पडताळणीमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला. तीच परिस्थिती सोमवारी (ता.२०) पिंपरीतील कर्मवीर भाऊराव पाटील केंद्रावर पाहायला मिळाली. सूत्रांच्या माहितीनुसार, पडताळणी समितीने मोठ्या संख्येने अर्ज प्रलंबित ठेवले आहेत.


प्रशासनाचा सावळागोंधळ
कागदपत्र पडताळणीसाठी शेकडो पालक शाळेत जमा झाले. परंतु शिक्षण अधिकाऱ्यांनी नियमांबाबत स्पष्टता न दिल्याने गोंधळ उडाला. शहरात तापमान ४२ अंशांच्या आसपास असताना पालकांना भर उन्हात ताटकळत ठेवण्यात आले. अर्ज मोठ्या संख्येने प्रलंबित राहिल्याने पडताळणीचा वेग अत्यंत संथ राहिल्याची तक्रार आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची आणि प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याची मागणी पालक करत आहे. अधिकारी येतात. परंतु पालकांच्या प्रश्नांना उत्तरे न देताच निघून जातात. त्यामुळे आरटीई प्रवेशाच्या पारदर्शकतेवर प्रश्‍न निर्माण होत आहेत.


आकडे बोलतात
आरटीई पडताळणी केंद्र - एकूण जागा- अर्ज पडताळणी केलेले
आकुर्डी - २६६८ - ७९४
पिंपरी - १३२० - ४००


‘‘आकुर्डी आणि पिंपरी पडताळणी समिती केंद्राला भेट दिली. पण दोन्ही केंद्रांवर पालकांची गर्दी होती. पडताळणी समितीकडून फक्त ३० टक्के अर्जाचा निपटारा होणे हे गंभीर आहे. असाच कामाचा वेग राहिला, तर पालकांनी पाल्यांना शाळेत कधी प्रवेश मिळवून द्यायचा ? ’’
- सोनाली आल्हाट, अध्यक्षा, अखिल भारतीय शिक्षण हक्क सभा पिंपरी


‘‘आरटीई प्रवेश प्रक्रिया कामकाजाचे काम सुरू आहे. विद्यार्थ्यांचे कागदपत्रे पडताळणी करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या अनुषंगाने आरटीई पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून दिली आहे.’’
- संगीता बांगर, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Candidate: नवनीत राणा, छगन भुजबळ चर्चेत; पण राज्यसभेसाठी राष्ट्रवादीचा वेगळाच मास्टरस्ट्रोक! अखेर नाव जाहीर, कुणाला दिली संधी?

Raigad Traffic: पालीकरांना मोठा दिलासा! शहरात अवजड वाहतुकीला सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय..

World Yogasana Championships: भारताचे निर्विवाद वर्चस्व! तब्बल २२ सुवर्णपदकांसह यजमान संघाचे अव्वल स्थान कायम

Video: Shreyas Iyer ची भारताच्या टी२० संघाचा कर्णधार बनल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर; म्हणाला, 'ही भावना खूपच...'

अयोध्येतील राममंदिराच्या तिजोरीवर डल्ला, कोट्यवधींची रक्कम गायब; अखिलेश यादवांच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT