पिंपरी-चिंचवड

नगरसेविकेच्या पतीला मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल नगरसेविकेच्या पतीला धमकी

CD

पिंपरी, ता. २० : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने कारवाईवेळी जप्त केलेला माल संबंधित दुकानदार या पथकाकडून जबरदस्तीने काढून घेत असतानाच मोबाइलमध्ये व्हिडीओ काढल्याने सहा ते सात जणांच्या टोळक्याने नगरसेविकेच्या पतीला मारहाण केली. त्यातील एकाने ‘माझे बांगलादेशात शूटर आहेत. त्यांना सांगून तुला मारून टाकू’'' अशी धमकी नगरसेविकेच्या पतीला दिली. हा प्रकार पिंपरी कॅम्पमधील उत्तमसिंग वलेचा चौक येथे रविवारी (ता. १९) रात्री आठच्या सुमारास घडला.

या प्रकरणी धनराज नथ्थूराम आसवानी (रा. पिंपळे सौदागर) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यांच्या पत्नी सविता आसवानी या महापालिकेत नगरसेविका आहेत. या प्रकरणात पोलिसांनी फय्याज शेख, आरिफ शेख, मुल्लाजी, अरबाज, शोहेब, उमर या नावाच्या व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. रविवारी महापालिकेचे पथक उत्तमसिंग वलेचा चौकाजवळील महापालिका वाहनतळाच्या समोरील मुनाफ कलेक्शन या कपड्याच्या दुकानाजवळ आले. तेथील पदपथावरील फेरीवाल्यांवर कारवाई करीत असताना मुनाफ कलेक्शन या दुकानाचा मालक फय्याज शेख व त्याच्या कर्मचारी महापालिकेच्या पथकाने कारवाई करून जप्त केलेला माल व इतर साहित्य त्यांच्याकडून जबरदस्तीने काढून घेत होते. त्यावेळी याबाबतचा व्हिडिओ फिर्यादी मोबाइलमध्ये काढत असताना फय्याज शेख यांच्यासह इतर आरोपींनी फिर्यादीला मारहाण व धक्काबुक्की केली. फय्याज शेख याने जिवे मारण्याची धमकी फिर्यादीला दिली.

कारवाईच्या मागणीसाठी पिंपरी कॅम्प बंद
या आरोपींवर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी, या मागणीसाठी फिर्यादी यांच्यासह पिंपरी कॅम्पमधील मोठ्या दुकानदार व्यापाऱ्यांनी रविवारी (ता. १९) सायंकाळी दुकाने बंद ठेवून पिंपरी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. तसेच रात्री शगून चौकात ‘रास्ता रोको’ केला. अखेर सोमवारी (ता. २०) पहाटे या प्रकरणी गुन्हा दाखल झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT