पिंपरी-चिंचवड

सकाळ संवाद

CD

रस्त्यावर धोकादायक खड्डे
ताथवडे येथील पुलाखालील सेवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले असून त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघातांच्या घटनाही घडल्या आहेत. या परिस्थितीची महापालिका प्रशासनाने तातडीने दखल घेऊन संबंधित रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी.
- विद्याश्री कोकणे, ताथवडे
13630


डीजेच्या दणदणाटाचा नागरिकांना त्रास
थेरगाव परिसरात मोठ्या आवाजात डीजे वाजविण्याचा त्रास वाढत असून त्यामुळे नागरिकांना गैरसोय होत आहे. विशेषतः महिला, वृद्ध आणि लहान मुलांना याचा मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. अशा प्रकारच्या ध्वनिप्रदूषणामुळे परिसरात स्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्यामुळे संबंधित प्रशासनाने याची दखल घेऊन अशा प्रकारांवर कठोर कारवाई करावी.
- सविता ठाकूर, थेरगाव


कचरा जाळल्याने आरोग्य धोक्यात
कासारवाडी येथील कचरा संकलन केंद्र तसेच मोरया पार्क परिसरात उघड्यावर कचरा जाळण्याचे प्रकार सुरू आहेत. या प्रकारामुळे निर्माण होणाऱ्या धुराने स्थानिक रहिवाशांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना श्वसनासंबंधी त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी, परिसरातील आरोग्यविषयक धोके वाढत आहेत. संबंधित प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन कचरा जाळण्याच्या प्रकारांवर बंदी घालावी आणि यावर ठोस उपाययोजना कराव्यात.
- ओंकार शेळकंदे, पिंपळे गुरव


रस्त्यालगतच्या उभ्या वाहनांमुळे कोंडी
जुना दिघी रस्ता परिसरात रस्त्यालगत बेकायदारीत्या उभी केली जाणारी वाहने ही गंभीर समस्या बनली आहे. मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दुचाकी व चारचाकी वाहने उभी केल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत असून स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांना सामोरे जावे लागत आहे. या वाहनांमुळे वळणांवर समोरून येणारी वाहने दिसत नाहीत, ज्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. रात्रीच्या वेळी अंधारामुळे उभी वाहने दिसत नसल्याने दुचाकीस्वारांचे नियंत्रण सुटण्याच्या घटना घडत आहेत. महापालिका प्रशासनाने या समस्येची दखल घेऊन संबंधित परिसर ‘नो-पार्किंग झोन’ म्हणून घोषित करावा किंवा रस्त्यालगत बेकायदेशीरपणे वाहने उभी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.
- एक नागरिक, दिघी
13631

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai BJP Protest Viral Video : वरळीत भाजप मोर्चामुळे वाहतूक ठप्प; कोंडीत अडकलेल्या महिलेने गिरीश महाजनांना झापलं, व्हिडिओ व्हायरल

SRH vs DC: Abhishek Sharma चं वादळी शतक! रोहित शर्माला मागे टाकत विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी; हैदराबादने रचला धावांचा डोंगर

Kolhapur Crime: कोल्हापूर हादरलं! व्याजाच्या पैशांच्या बदल्यात महिलेसोबत शरीरसंबंध ठेवले

Video: पुण्यात पीएमपी बस थेट दुकानात घुसली! अप्पा बळवंत चौकातील थरार; व्हिडीओ व्हायरल

Baramati News : जय पवार यांच्या भाषणाने बारामतीकर भावुक.....

SCROLL FOR NEXT