पिंपरी-चिंचवड

दारूसाठी पैसे मागितले, नकार मिळताच मारहाण व लूट

CD

पिंपरी : दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत त्याच्याकडील रोकड लुटली. तसेच ‘मी इथला भाई असून मी तडीपार होतो’ अशी आरडाओरड करून आरोपीने परिसरात दहशत निर्माण केली. हा प्रकार निगडी येथे संजय काळे मैदानाजवळ घडला. या प्रकरणी ऋषिकेश जाधव (रा. पंचतारानगर, आकुर्डी) यांनी निगडी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी योगेश माणकेश्वर (रा. पांढरकर वस्ती, आकुर्डी) याला अटक केली असून, त्‍याचा साथीदार आकाश धुमाळ (रा. देहूगाव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

फ्लॅट विक्रीत फसवणूक
पिंपरी : एका फ्लॅटवर दोन बँकांचे कर्ज असताना केवळ एकाच बँकेचे कर्ज असल्याची माहिती देऊन एका व्यक्तीची ९२ लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना पिंपरी येथे घडली. याप्रकरणी ज्ञानेश्वर आबासाहेब कासार (रा. कोहिनूर टॉवर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी युनूस मोहम्मद शेख (रा. इंद्र विहार बिल्डिंग, देहूरोड, किवळे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने फिर्यादी यांना पिंपरीतील कोहिनूर टॉवर येथील ए विंगमधील ४०१ क्रमांकाचा फ्लॅट विक्री केला. या फ्लॅटवर ॲक्सिस बँक आणि बँक ऑफ इंडिया या दोन्ही बँकांचे कर्ज होते. मात्र, आरोपीने केवळ बँक ऑफ इंडिया या एकाच बँकेचे कर्ज असल्याचे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला आणि ९२ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली.

गांजा बाळगणाऱ्या एकाला अटक
पिंपरी : विक्रीसाठी गांजा जवळ बाळगणाऱ्या एकाला पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने हिंजवडी परिसरातून अटक केली. त्याच्याकडून गांजा आणि मोबाइल असा एकूण २७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बिपिन कुमार पृथ्वीपाल प्रजापती (रा. माण गाव, मूळ- उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. हिंजवडी येथील माण गाव रस्त्यावर आरोपी गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे ३४८ ग्रॅम गांजा सापडला.

तडीपार गुंडाला कोयत्यासह अटक
पिंपरी : जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केलेले असतानाही शहरात आलेल्या एका गुंडाला दापोडी पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून एक कोयता जप्त केला. ही कारवाई कासारवाडी येथे करण्‍यात आली. अथर्व उर्फ सोन्या दीपक परदेशी (रा. कासारवाडी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

कामास नकार दिल्याने वेल्डरला मारहाण
पिंपरी : कामास नकार दिल्याच्या कारणावरून एका वेल्डरकाम करणाऱ्या तरुणाला बिअरच्या बाटलीने मारहाण केली. तसेच याबाबतचा जाब विचारणाऱ्या बहिणीचाही विनयभंग केला. ही घटना दिघी येथे घडली. प्रदीप सिंग (रा. साई पार्क, दिघी) असे गुन्हा दाखल झालेल्‍या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ३८ वर्षीय तरुणाने दिघी पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी आरोपीला कामासाठी नकार दिला होता. यातून आरोपीने फिर्यादीच्या डोक्यात बिअर आणि सोड्याची बाटली मारून खुर्चीने मारहाण करून त्यांना जखमी केले. दरम्यान, फिर्यादीची बहीण याबाबत विचारणा करण्यास गेली असता आरोपीने त्यांच्या अंगावर धावून जात विनयभंग केला.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Crime: कोल्हापूर हादरलं! व्याजाच्या पैशांच्या बदल्यात महिलेसोबत शरीरसंबंध ठेवले

Baramati News : जय पवार यांच्या भाषणाने बारामतीकर भावुक.....

Latest Marathi News Live Update: बुधवारपर्यंत करार न झाल्यास इराणवर बॉम्बहल्ला करण्याची ट्रम्प यांची धमकी

Pune News : पालखी मार्गावरील केबल्स काढा; अतिरिक्त आयुक्तांनी दिले आदेश

दुखापतींनी त्रासलेल्या CSK ला दिलासा मिळणार! MS Dhoni मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार... 'त्या' Video ने दिले संकेत

SCROLL FOR NEXT