पिंपरी, ता. २१ : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचे भासवून एका दाम्पत्याला तब्बल २७ तास ‘डिजिटल अरेस्ट’ करून १२ लाख रुपयांना गंडा घालण्याचा सायबर गुन्हेगारांचा प्रयत्न ८१ वर्षीय पित्याने पोलिसांच्या मदतीने उधळून लावला.
रविवारी (ता. १९) सकाळी अकराच्या सुमारास निगडी परिसरातील एका तरुणाला व्हॉट्सॲप कॉल आला. समोरील व्यक्तीने, ‘तुमच्या नावाचे पार्सल पकडले असून त्यात पाच पासपोर्ट आणि एमडी ड्रग्ज सापडले आहे,’ असे सांगून भीती घातली. त्यानंतर ‘सिग्नल’ नावाचे ॲप डाऊनलोड करायला लावून व्हिडिओ कॉलद्वारे दांपत्याला ‘डिजिटल अरेस्ट’ ठेवले. घाबरलेल्या तरुणाकडून सायबर चोरट्यांनी बँक खाते व आधार कार्डची माहिती घेतली. त्यांनी पोलिसांचे ‘क्लिअरन्स सर्टिफिकेट’ देण्यासाठी बँक खात्यावर पैसे जमा करण्यास त्याला सांगितले. तरुणाने म्युच्युअल फंडातून बारा लाख रुपये काढण्याची तयारी केली. ही रक्कम खात्यात येताच ती सायबर गुन्हेगारांना पाठविणार होते.
दरम्यान, तरुणाने सायबर गुन्हेगारांची नजर चुकवून ही माहिती आपल्या वडिलांना दिली. वडिलांनी तत्काळ सायबर पोलिस ठाण्याचे अंमलदार सोपान बोधवड यांच्याशी संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य ओळखून बोधवड, मुकुंद वारे आणि महिला अंमलदार स्नेहा म्हस्के यांनी पीडिताच्या घरी धाव घेतली. हा प्रकार ‘डिजिटल अरेस्ट’ करून फसवणुकीचा असल्याचे पोलिसांनी पटवून दिले. त्यामुळे दाम्पत्य बचावले.
-----------
पोलिसांच्या मोहिमांना श्रेय
सायबर गुन्ह्यांबाबत पिंपरी चिंचवड पोलिस ज्येष्ठ नागरिक व सोसायट्यांमध्ये जनजागृती मोहिमा राबवित आहे. यामुळेच हा प्रकार तत्काळ लक्षात आला व फसवणूक टाळता आली, अशी भावना या ज्येष्ठ नागरिकाने व्यक्त केली. त्याने पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांचेही आवर्जून आभार मानले.
-------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.