पिंपरी-चिंचवड

पिंपरीत साकारणार माता रमाई स्मारक

CD

पिंपरी, ता. २२ ः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पिंपरीतील स्मारकालगत महापालिका माता रमाई स्मारक उभारण्यात येणार आहे. त्याच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. यांसह विविध विकास कामांना स्थायी समितीने बुधवारी (ता. २२) मंजुरी दिली.
महापालिका स्थायी समितीची सभा सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. समिती सदस्यांसह महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, नगरसचिव मुकेश कोळप उपस्थित होते. विविध कामांसाठी मंडप व्यवस्था, विविध इमारतींचे फायर सेफ्टी ऑडिट; कचरा संकलन व अलगीकरण जनजागृती; विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, एलईडी टीव्ही खरेदी; नवी व जुनी सांगवीत बोअरवेल; शाळांसाठी साहित्य; कुशल कर्मचारी पुरवणे; रावेत येथील जगद्‍गुरु संत तुकाराम महाराज पुलाचे सुशोभीकरण; मालमत्ता कर वसुलीसाठी उपाययोजना; संगणक प्रणाली विकसित करणे; रहाटणीत पदपथ, थेरगाव स्थापत्य विषयक कामे; स्वच्छ भारत अभियान कामकाजासाठी एजन्सी निवड; आकुर्डी एमएससीआयटी केंद्र अद्ययावतीकरण व नूतनीकरण; क्रांतिवीर चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालय स्वच्छता; वाकड-पुनावळे- ताथवडेतील रस्ते विकसित करणे; पिंपळे निलख, खुशालनगर जलवाहिनी दुरुस्ती; रावेत, किवळे व वाल्हेकरवाडीतील अनधिकृत बांधकामे कारवाई; चिखलीमधील नाल्यांची साफसफाई; मैलाशुद्धीकरण प्रकल्पांचे संचालन; जलनिस्सारण व्यवस्था आदी कामांना मान्यता दिली.

माता रमाईंचे स्मारक हे पिंपरी चिंचवडसाठी सामाजिक जाणिवेचा वारसा ठरेल. त्यांच्या त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हे स्मारक केवळ स्थापत्यशास्त्राचा नमुना न राहता समाजातील प्रत्येक घटकाला प्रेरणा देणारे ठरेल. या कामाचा दर्जा उत्तम राखत ते वेळेत पूर्ण करण्याला आमचे प्राधान्य असेल.
- अभिषेक बारणे, सभापती, स्थायी समिती, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हार्दिक पांड्या २४ तासांत ‘अनफिट’; IND vs AFG वनडे मालिकेपूर्वी बंगळुरूत नेमकं काय घडलं? Inside Story

Pune Bengaluru Highway : पुणे-बंगळूर हायवेने प्रवास करताना सावधान! प्रत्येक 5 किलोमीटरवर बसवले स्मार्ट कॅमेरे; नियम मोडल्यास होणार थेट कारवाई

Latest Marathi News Live Update : होर्मुझमध्ये अमेरिकेचा जहाजावर हल्ला, ३ भारतीयांचा मृत्यू

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगापूर्वीच सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ! DA मध्ये होणार दोनदा वाढ, जाणून घ्या अपडेट

Ladki Bahin Yojana May Installment : लाडक्या बहिणींसाठी मे महिन्याच्या हप्त्याची तारीख ठरली; शासन निर्णय जारी

SCROLL FOR NEXT