पिंपरी, ता. २४ ः ‘‘मुलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांच्यामधील चैतन्य जागविण्याचे काम शाळेत झाले पाहिजे,’’ असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक व शिक्षणतज्ज्ञ दिलीप फलटणकर यांनी केले.
पिंपरी येथील विद्यानिकेतन शाळेत आयोजित केलेल्या वर्षाअखेर सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी शिक्षण विभागाच्या सहाय्यक प्रशासन अधिकारी रजिया खान, पर्यवेक्षक अंजली झगडे, प्रमिला जाधव, श्रीकांत चौगुले सुजाता कर्जतकर, शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिरीष पडवळ उपस्थित होते. शाळांसाठी आयोजित करण्यात आलेल्या नाविण्यपूर्ण उपक्रम व आदर्श परिपाठ या उपक्रमात यशस्वी ठरलेल्या विद्यानिकेतन पिंपरी, कांतीलाल खिंवसरा शाळा, भुमकरवस्ती कन्या शाळा, थेरगाव कन्या शाळा, यशवंतराव चव्हाण हिंदी शाळा, कमला नेहरू हिंदी शाळा यांना गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच ‘ग’ प्रभाग व ‘ह’ प्रभागातील उपक्रमशील मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला. रजीया खान यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक श्रीकांत चौगुले यांनी तर आभार शिवाजी दौंडकर यांनी मानले. मनीषा सावंत यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.