पिंपरी, ता. २५ ः वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना शुद्ध व थंड पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शहरात विविध सामाजिक संस्था, मित्र परिवार आणि लोकप्रतिनिधींच्या पुढाकारातून पाणपोई उभारण्यात येत आहेत. पिंपरी, चिंचवड, निगडी, प्राधिकरण, भोसरी, आकुर्डी, पिंपळे सौदागर, वाकड आदी वर्दळीच्या भागांसह प्रमुख बसथांबे, रेल्वे स्थानक, बाजारपेठा आणि महापालिकेच्या उद्यानांमध्ये या पाणपोई सुरू करण्यात आल्या आहेत. विशेषतः दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडणाऱ्या नागरिकांना आणि ज्येष्ठांना यामुळे दिलासा मिळत आहे.
दरम्यान, शहरातील काही सार्वजनिक ठिकाणांवरील पाणपोई बंद अवस्थेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. बसथांबे व रेल्वे स्थानक परिसरातील काही ठिकाणी पाण्याची सोय नसल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. याची दखल घेत महापालिका प्रशासनाने विविध महत्त्वाच्या ठिकाणी पाणपोई सुरू करण्यास गती दिली आहे.
या पाणपोईंच्या माध्यमातून नागरिकांना मोफत शुद्ध व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. अनेक ठिकाणी फिल्टर केलेले थंड पाणी (कॅन जार) तसेच पारंपरिक रांजणांमधून पाणी देण्याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे वाढत्या तापमानात नागरिकांची तहान भागण्यास मोठी मदत होत आहे.
‘‘दरवर्षी उन्हाळ्यात मी रस्त्यावर पाण्याचा रांजण ठेवतो. त्यामुळे वाटसरूंना पाणी मिळते आणि त्यांचे आशीर्वादही मिळतात. गेली ४० वर्षे ही सेवा सुरू असून, यातून समाधान मिळते.’’
- दत्ता धामणस्कर, ज्येष्ठ नागरिक
पाणपोईची प्रमुख ठिकाणे
भोसरी व निगडीतील वर्दळीचे रस्ते, महापालिका भवन व प्रमुख रुग्णालय परिसर, पवना नगर व वाल्हेकरवाडी, चिंचवड स्टेशन व साने चौक परिसरातील रिक्षा स्टँड व बसथांबे, पिंपरी कॅम्प व मुख्य बाजारपेठ, रावेत व काळेवाडी मुख्य रस्ते, बर्ड व्हॅली उद्यान (चिंचवड) व राजमाता जिजाऊ उद्यान (पिंपळे गुरव) तसेच महापालिका शाळा, रुग्णालये व उद्यान परिसर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.