पिंपरी-चिंचवड

क्रीडा प्रबोधिनी प्रवेशासाठी मंगळवारपर्यंत अर्ज पाठवा

CD

पिंपरी, ता. २५ ः म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडापीठ अंतर्गत नऊ क्रीडा प्रबोधिनीत सरळ प्रवेश आणि कौशल्य चाचणी प्रक्रियेअंतर्गत प्रत्येकी ५० टक्के विविध निकषांनुसार निवासी आणि अनिवासी प्रवेश देण्यात येणार आहेत.
क्रीडा प्रबोधिनीमध्ये ज्यूदो, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, शूटिंग, फुटबॉल, जलतरण, ॲथलेटिक्स, कुस्ती, बॅडमिंटन, धनुर्विद्या, हॅण्डबॉल आदी एकूण १६ क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण दिले जाते. या संबंधित खेळांतील राज्यस्तरावरील पदक प्राप्त खेळाडू किंवा राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधित्व केलेल्या १९ वर्षांच्या आतील खेळाडूंची तज्ज्ञ समिती समक्ष चाचणी घेऊन सरळ प्रक्रियेद्वारे प्रवेश निश्चित केला जातो. तर राज्यस्तरावरील स्पर्धेतील सहभागी खेळाडूंसाठी संबंधित खेळनिहाय कौशल्य चाचणी घेऊन गुणानुक्रमे त्यांचा प्रवेश केला जातो. या दोन्ही चाचण्यांमध्ये निवड झालेल्या खेळाडूंची वैद्यकीय पथकाद्वारे चाचणी घेऊन शारीरिकदृष्ट्या सुदृढ खेळाडूंची अंतिम निवड केली जाणार आहे.
जिल्हास्तरावरील क्रीडा प्रबोधिनी विभाग चाचणीसाठी सहभागी होणाऱ्या खेळाडूंची नावनोंदणी जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालय, पुणे येथे करावी. खेळाडूंचे नाव, जिल्हा, खेळ प्रकार, जन्मदिनांक, वय व क्रीडा कामगिरी
याबाबत माहिती संकलित करुन ती क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्याकडे २८ एप्रिलपर्यंत dsopune6@gmail.com या ई-मेल वर अर्ज पाठवावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Accident: मुंबईत पुन्हा बेस्टचा अपघात! इलेक्ट्रिक बसच्या धडकेत २ जण जखमी; थरार CCTV मध्ये कैद, Video Viral

Kolhapur Theft Case : ‘पोलिसाच्या घरातील तिजोरी अर्धा किलोमीटर शेतात नेत फोडली; लक्ष्मी पूजनासाठी ठेवलेले पैसे चोरले, कोल्हापुरातील घटना

Chiplun Bribery Case : गरोदर महिलेकडून 4,500 रुपयांची लाच घेणाऱ्या 'त्या' महिला डॉक्टरचे होणार निलंबन? कोर्टाकडून जामीन मंजूर, पण नोकरी धोक्यात?

राज्यातील चार IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, विदर्भातील दोघांचा समावेश, तातडीने कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश

दत्तकपुत्र होता बॉलिवूडचा हा सुपरस्टार ! आईनेच काका-काकूंच्या केलं होतं स्वाधीन; मामाने बदललं आयुष्य

SCROLL FOR NEXT