पिंपरी-चिंचवड

विद्यार्थ्यांनी गायिले ऐतिहासिक पोवाडे

CD

पिंपरी, ता. २८ ः विद्यार्थ्यांच्या संवाद कौशल्याला वाव मिळावा, सभाधीटपणा वाढावा या हेतूने ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘एनआयई’ उपक्रमांतर्गत पाच दिवसीय पोवाडा प्रशिक्षण कार्यशाळा झाली. शाहिरा शीतल कापशीकर यांनी प्रात्यक्षिकासह पोवाडा, फटका याबाबत मार्गदर्शन केले.
निगडीतील मातृमंदिर विश्‍वस्त संस्थेच्या विशेष सहकार्याने आयोजित कार्यशाळेत पोवाडा म्हणजे काय?, तो कसा सादर केला जातो? पोवाडा सादर करताना वाचन शब्दांचे उच्चार? आवाजाचा चढ-उतार कसे असावे? यांसह महाराष्ट्रातील विविध प्रसिद्ध शाहिरांची माहिती सादर केली. जोशपूर्ण आणि दमदार सादरीकरण; ढोलकी, ताशा, तुणतुणे, दिमडी, टाळ यांचा वापर करीत उत्तम अभिनय, वक्तृत्व, काव्य संगीत यांचा संगम साधत श्रोत्यांना ऐतिहासिक शूरवीरांच्या पराक्रमाचे, चरित्राचे सादरीकरण कसे करावे? यावर कापशीकर यांनी मार्गदर्शन केले. पार्थ पिसोळकर (तबला), मल्हार हांडे (हार्मोनिअम) साथ दिली. प्रशिक्षणार्थींना मातृमंदिर विश्‍वस्त संस्था कोषाध्यक्ष शिवराज पिंपुडे, सहकार्यवाह सुधीर कुलकर्णी, ‘सकाळ’चे मुख्य उपसंपादक तथा विनोदी साहित्यकार सु. ल. खुटवड, ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय पूर्व माध्यमिक विभाग प्रमुख समाधान सूसर, वर्षा जाधव, अशोक कामथे यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन गौरविले. ‘सकाळ एनआयई’चे वरिष्ठ व्यवस्थापक विशाल सराफ यांनी संयोजन केले.

‘‘विद्यार्थ्यांना पोवाड्यांची माहिती होणे आवश्‍यक आहे. आपला देदीप्यमान इतिहास, शौर्य, पराक्रम व जाज्वल्य देशभक्तीचा वारसा यांची माहिती पोवाडा सादरीकरणातून मिळते. ओजस्वी स्वरातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे पराक्रम जीवंत होतात. पोवाडे हे केवळ मनोरंजनासाठी नसून आपला इतिहास, संस्कृती आणि परंपरा जपण्याचे महत्त्वाचे माध्यम आहे. नवीन पिढीच्या मनात प्रेरणा, देशभक्ती आणि विद्यार्थ्यांच्या मनात अभिमानाची ज्योत प्रज्वलित करण्यासाठी पोवाडा हे उत्तम माध्यम आहे.
- शाहिरा शीतल कापशीकर, प्रशिक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Crime News : "इथून पुढे कोणत्याही हिंदू मुलीच्या नादाला लागणार नाही..." शाहिद सनदीने हात जोडून मागितली माफी, व्हिडिओ समोर

IPL 2026: विराट कोहलीला एकच व्यक्ती चॅलेंज देऊ शकतो, तो म्हणजे...; इरफान पठाणची पोस्ट चर्चेत, तुम्हालाही पटेल त्याची गोष्ट

नेहमी दुसऱ्यांकडून सल्ला घेतात 'या' 2 मुलांकाचे लोक; एक चुकीचा निर्णय करतो आयुष्य उध्वस्त, करियर अन् पर्सनल लाइफचे होते नुकसान

Jet Fuel Price Hike : जेट इंधन दरवाढीने विमान कंपन्या संकटात; उड्डाण सेवा ठप्प होण्याचा धोका

भारतीय गोलंदाजांना झोडावंस वाटतं! मिसुरडंही न फुटलेल्या पाकिस्तानी फलंदाजाची धमकी; म्हणतो, ते समोर आले की...

SCROLL FOR NEXT