पिंपरी-चिंचवड

भारतीय जैन संघटना विद्यालयास गुणवत्ता अभियानात प्रथम क्रमांक

CD

पिंपरी, ता. २७ : पुणे जिल्हा परिषद माध्यमिक विभाग तसेच पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या गुणवत्ता संवर्धन अभियानांतर्गत जिल्ह्यातील सुमारे १६७० विद्यालयांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत प्रशासकीय, आर्थिक, क्रीडा, कला, विज्ञान तसेच शैक्षणिक गुणवत्ता अशा विविध निकषांवर सखोल पडताळणी करण्यात आली. या सर्वांगीण मूल्यांकनात शहरी गटातून पिंपरी विभागातील भारतीय जैन संघटना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश मिळविले.
या प्रसंगी संस्थेचे प्रबंध समिती सदस्य व प्रकल्प व्यवस्थापक सुरेश साळुंके, प्राचार्य दिलीपकुमार देशमुख, उपप्राचार्य अविनाश यादवाडकर, पर्यवेक्षक गजानन वाढे, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय जाधव तसेच वाघोली विद्यालयाचे प्राचार्य संतोष भंडारी उपस्थित होते. शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर तसेच मुख्याध्यापक संघ राज्य महामंडळाचे सचिव नंदकुमार सागर यांच्या हस्ते विद्यालयाने पारितोषिक स्वीकारले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC चा मोठा प्लॅन! फ्लायओव्हरमुळे प्रवासात २५ मिनिटांची बचत होणार, कुठून कुठे बांधणार? जाणून घ्या मार्ग...

IPL 2026 : वैभव सूर्यवंशी बॅटमध्ये 'AI Chip' लावून खेळतोय! पाकड्यांच्या पोटात दुखतंय, उलटसुलट आरोप करत सुटलेत...

LPG Cylinder Rules 2026 : १ मे पासून एलपीजी गॅसचे नियम बदलणार, कधी बुक करता येईल सिलिंडर? महत्त्वाची अपडेट समोर

१३२ किलोवरून थेट ६५ किलोवर! फू बाई फू फेम आरती सोलंकीनं पाणी पुरी खाऊन बदलल्या 'या' सवयी

Latest Marathi News Live Update : मंगळुरू कुकर स्फोट प्रकरणातील आरोपी मोहम्मद शरीकला १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा

SCROLL FOR NEXT