पिंपरी-चिंचवड

निगडीत मातंग समाजाची बैठक

CD

पिंपरी, ता. २७ ः साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे पूर्णाकृती स्मारक निगडी येथे मातंग समाजाच्या पुढाकारातून आरक्षणातील ‘अ-ब-क-ड’ उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ व्यापक बैठक घेण्यात आली. बैठकीत ‘अ-ब-क-ड’ उपवर्गीकरण हा केवळ प्रशासकीय निर्णय नसून, उपेक्षित व वंचित घटकांसाठी नवसंजीवनी ठरणारा महत्त्वाचा टप्पा असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
बैठकीत सर्वांनी एकमताने ठरवले की, आगामी काळात या प्रश्नावर संघटित व ताकदीने लढा उभारला जाईल. यासाठी गट-तट, पक्षभेद बाजूला ठेवून समाजहिताला सर्वोच्च प्राधान्य देत सर्वांनी एकदिलाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. बैठकीचे नियोजन साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे प्रबोधन पर्व समितीचे अध्यक्ष संदीपान झोंबाडे, बहुजन विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष संजय धुतडमल, अध्यक्ष मार्गदर्शक डी. पी. खंडाळे, हिंदू मातंग सेनेचे विश्वस्त अनिल गायकवाड आदींनी केले. दरम्यान विधानपरिषद आमदार अमित गोरखे म्हणाले की, उपेक्षित व मागास घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी हा लढा शेवटपर्यंत लढण्याचा निर्धार सर्वांनी मिळून केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Record! विराट कोहलीने IPL इतिहासात कोणालाच न जमलेला विक्रम केला, पहिला फलंदाज ठरला; रोहित खूपच लांब राहिला

Commercial Gas Cylinder Issue : व्यावसायिक गॅसचा पुरवठा विस्कळितच; खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यांमध्ये १० हजारांपेक्षा अधिक ग्राहक

IPL 2026 Point Table: दक्षिणेचा 'दिल्लीवर' कब्जा! RCB चा मोठा विजय, दोन दिवसांपूर्वी २६४ धावा करणारा DC आज ७५ धावांत तंबूत

IPL 2026 मध्ये मोठा धक्का! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर मोठं कांड उघड; RCB vs GT सामन्यात गोंधळ, दोघांना अटक, काय घडलं?

DC vs RCB Live: दिल्ली कॅपिटल्सचे वस्त्रहरण! पण, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 'नकोसा' डाग मिटवता नाही आला; भुवी, जोश यांचा कहर...

SCROLL FOR NEXT