पिंपरी-चिंचवड

शिवरायांवरील चुकीच्या वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध

CD

पिंपरी, ता. २८ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी केलेल्या कथित वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसने तीव्र आंदोलन छेडले. शहरातही काँग्रेस कार्यकर्त्यांनी पिंपरी चौकातील भीमसृष्टी स्मारकासमोर निषेध नोंदवला. यावेळी कार्यकर्त्यांनी धीरेंद्र शास्त्री यांची प्रतीकात्मक प्रतिमा दाखवत निदर्शने केली.
आंदोलनप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस बाबू नायर, प्रदेश सचिव संदेश नवले, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सायली नढे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती विष्णुपंत नेवाळे, बारा बलुतेदार संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष सोमनाथ शेळके, मराठा सेवा संघाचे दक्षिण भारताचे कार्याध्यक्ष प्रकाश जाधव, ओबीसी महासंघाचे नेते आनंदा कुदळे तसेच काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे आदी उपस्थित होते. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ या ठिकाणी ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे सामूहिक वाचन करण्यात आले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: स्टॉयनिसने लाज वाचवली! पंजाबला दोनशेपार पोहोचवले; राजस्थानच्या गोलंदाजांनी केला होता करेक्ट कार्यक्रम

यवतमाळ जिल्हा बँक बरखास्तीनंतर राजकारण तापले! ‘सत्तेतच डाव-प्रतिडाव’; निवडणुकीआधीच आरोपांची सरबती

PBKS vs RR Live: प्रीति झिंटाच्या काळजाचा ठोका चुकलाच होता, पण...! श्रेयस अय्यरसोबत असं काही घडलं की, ती घाबरली; नेमकं काय?

Nitin Gadkari Hydrogen Fuel Statement : पेट्रोल-डिझेल गाड्या होणार बंद? नितीन गडकरींचं मोठं विधान; आता पेट्रोलऐवजी 'या' इंधनावर धावणार गाड्या!

आई मुस्लिम, वडील गुजराती... एकमेकांवर प्रेम असूनही आरती सोलंकीचे आई-वडील झालेले वेगळे, हे होतं कारण

SCROLL FOR NEXT