पिंपरी, ता. २७ : ‘‘पिंपरी चिंचवड शहरातील सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करून नागरिकांना मूलभूत सुविधा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून द्या. महापालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व पुणे महानगर परिवहन महामंडळ यांनी समन्वय ठेवून विकास कामांचा वेग वाढवा,’’ अशा सूचना नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिल्या.
शहरातील विकासकामांबाबत महापालिकेत आयोजित आढावा बैठकीत मिसाळ बोलत होत्या. या वेळी महापौर रवी लांडगे, विधान परिषद सदस्य उमा खापरे, अमित गोरखे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
डॉ. सूर्यवंशी यांनी संगणकीय सादरीकरणातून शहरात सुरू असलेले पाणीपुरवठा, अमृत योजना, घनकचरा व्यवस्थापन, रस्ते विकास, ड्रेनेज व पायाभूत सुविधा, मेट्रो, पंतप्रधान आवास योजना, हुतात्मा क्रांतिवीर चापेकर वाडा, अग्निशमन केंद्र, नोकरदार महिला वसतिगृह, संतपीठ, मनोरंजन, नदीसुधार, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता तसेच विविध नागरी प्रकल्पांची माहिती दिली.
मिसाळ यांनी प्रत्येक प्रकल्पाची सध्यस्थिती, कामांचा प्रगतीदर, निधीचे वितरण, कामातील तांत्रिक अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांचा आढावा घेतला. लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा, मलनिस्सारण आणि मनोरंजन प्रकल्पांच्या माध्यमातून शहर विकासाबाबत मार्गदर्शन करून सार्वजनिक ठिकाणे, उद्याने आणि नागरिकांसाठी उपलब्ध सुविधा अधिक दर्जेदार करण्यासाठी कामांना गती देण्याच्या सूचना दिल्या. आवास योजनेतील लाभार्थ्यांना वेळेत घरे उपलब्ध करून देण्याची सूचनाही त्यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.