पिंपरी-चिंचवड

अजित गव्हाणे यांची तलवार म्यान!

CD

जयंत जाधव : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १ : महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक पाच भोसरीतील रामनगर-सावंतनगर-गवळीनगर येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते अजित गव्हाणे यांनी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे पक्षाच्या अन्य इच्छुक व पदाधिकारांचे खच्चीकरण झाल्याची चर्चा आहे. नेता किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणीच मैदानात नसल्याने कार्यकत्यांचे अवसान गळाल्याचे बोलले जात आहे.

गव्हाणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष असून त्यांनी २०२४ मध्ये भोसरी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवली होती. गव्हाणे हे पिंपरी चिंचवड महापालिकेत २००२ पासून सलग चार वेळा नगरसेवक होते. त्यांनी स्थायी समिती अध्यक्षपदही भूषविले आहे. मागील निवडणुकीत सॅंडविक कॉलनी-गवळीनगर प्रभाग क्रमांक पाचमधून अजित गव्हाणे यांनी आमदार महेश लांडगे यांचे बंधू तथा कामगार नेते सचिन लांडगे यांना पराभूत केले होते. त्याचा वचपा आमदार लांडगे यांच्याकडून या निवडणुकीत काढला जाणार होता, अशी चर्चा आहे. अजित गव्हाणे यांच्याबरोबर मागील वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका अनुराधा गोफणे याही विजयी झाल्या होत्या. पण, त्यांनी यावेळी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर, माजी नगरसेवक जालिंदर शिंदे यांनाही भाजपने मेदवारी दिली आहे.
भाजपच्या माजी नगरसेविका भीमाबाई फुगे व प्रियांका बारसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे र्ज दाखल केला आहे. त्यामुळे या प्रभागात राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात लढत आहे. दरम्यान, या परिस्थितीबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क साधला असता, अजित गव्हाणे उपलब्ध झाले नाहीत.

अजित गव्हाणे यांचे निवडणूक न लढण्याचे कारणे

- आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढल्याने यावेळी विरोधी पक्षांकडून लक्ष्य केले जाण्याची शक्यता होती. त्यामुळे संघर्ष टाळण्यासाठी माघार
- माजी नगरसेवक जालिंदर शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना प्रभाग पाचमधून उमेदवारी मिळाल्याने अजित गव्हाणे यांचे मानसिक बळ घटले
- विधानसभा निवडणूक लढल्याने महापालिका निवडणुकीत हरल्यास राजकीय कारकीर्द अडचणीत येऊ नये, म्हणून ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ ही भूमिका घेऊन शांत राहण्याची भूमिका घेतल्याची चर्चा
- राजकीय वातावरण काहीही बदलू शकते. म्हणून प्रभाग पाचमधून भाजपने जालिंदर शिंदे यांना उमेदवारी दिलेली आहे. आमदार लांडगे यांचे बंधू सचिन लांडगे यांचा ‘डमी’ अर्ज दाखल

PNE26V81527

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

India Cricket Matches in 2026: टी२० वर्ल्ड कप ते इंग्लंड, न्यूझीलंडचे दौरे... भारतीय संघाचे २०२६ वर्षात कसे आहे संपूर्ण वेळापत्रक?

Khandala Accident : खंडाळा घाटात भीषण अपघात; भरधाव टेम्पोचे नियंत्रण सुटले; ५ वाहनांना धडक; ट्रॅफिक अर्धा तास ठप्प!

SCROLL FOR NEXT