पिंपरी-चिंचवड

नववर्षानिमित्त श्रीमद् भागवत सप्ताहाचे आयोजन

CD

पिंपरी, ता. १ ः विशालनगर येथील इस्कॉन भक्ती सेंटर फॉर एज्युकेशन अँड कल्चर यांच्या वतीने नववर्षानिमित्त वार्षिक श्रीमद् भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. नववर्षाचा शुभ व आध्यात्मिक प्रारंभ व्हावा या उद्देशाने गेल्या तीन वर्षांपासून ही परंपरा सातत्याने जपली जात आहे. १ ते ७ जानेवारी या कालावधीत हा सप्ताह पार पडेल.
या सात दिवसीय आध्यात्मिक सोहळ्यात सुप्रसिद्ध कथा व्यास परम पूज्य श्रीमान सार्वभौम प्रभूजी श्रीमद् भागवत कथाकथन करतील. दररोज सायंकाळी ५ ते ८ दरम्यान कीर्तन, श्रीमद् भागवत कथा व भाविकांसाठी प्रसाद वितरण करण्यात येणार आहे. या वर्षीच्या कथावाचनाचा विषय ‘हरिनामाची महिमा’ असा आहे. विशेष आकर्षण म्हणून भव्य कलश स्थापना, पारंपरिक छप्पन भोग व महाआरती होणार आहे. हा सप्ताह इस्कॉन बीसीईसीचे वरिष्ठ मार्गदर्शक कनाई ठाकूर प्रभू व गौर लीला प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत आहे. या वेळी कलश स्थापना, कथा यजमान, प्रसाद सेवा व महाआरती अशा विविध सेवा व प्रायोजनाच्या संधी भाविकांसाठी उपलब्ध असतील. या सोहळ्यात सर्व भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

YouTube Down Worldwide: जगभरातील लोकप्रिय व्हिडिओ प्लॅटफॉर्म you tube अचानक बंद

आजचे राशिभविष्य - 18 फेब्रुवारी 2026

Sahyadri Tiger Reserve: सह्याद्री व्याघ्र-लास्ट वाइल्डरनेसमध्ये सामंजस्य करार; मानव व वन्यजीव सहअस्तित्व होणार बळकट!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 18 फेब्रुवारी 2026

Sidharth Malhotra's Father Passes Away : सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन!, भावूक होत केली पोस्ट अन् म्हणाला...

SCROLL FOR NEXT