पिंपरी-चिंचवड

पालिका निवडणूकीसाठी पिंपरीत ९९ अर्ज अवैध

CD

पिंपरी, ता. १ ः पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणूकीसाठी बुधवारी (ता. ३१) पार पडलेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीत ९९ अर्ज अवैध ठरले. एक हजार ९९३ पैकी एक हजार ८९४ अर्ज वैध ठरले.
महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून १६ जानेवारी रोजी मतमोजणी आहे. निवडणूक कामकाजासाठी ३२ प्रभाग व १२८ जागांची विभागणी आठ क्षेत्रीय कार्यालयनिहाय झाली आहे. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या कक्षात चार प्रभाग आहेत. चार प्रभागांसाठी एक याप्रमाणे आठ निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केले असून त्यांच्यासाठी स्वतंत्र कार्यालये स्थापन केली आहेत. त्यांच्याकडे आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी गुरुवारी (ता. १) सकाळपर्यंत सुरू होती. प्रभाग १, ३, ५, १२ आणि २४ मधील एकही अर्ज बाद झाला नाही.

क्षेत्रीय कार्यालयनिहाय अवैध अर्ज
कार्यालय ः प्रभाग ः एकूण अर्ज ः अवैध ः वैध
अ ः १०, १४, १५, १९ ः २९१ ः १२ ः २७९
ब ः १६, १७, १८, २२ ३०४ ः ०० ः ३०४
क ः २, ६, ८, ९ ः २४६ ः ५ ः २४१
ड ः २५, २६, २८, २९ ः २३६ ः ७ ः २२९
इ ः ३, ४, ५, ७, ः १६० ः ६ ः १५४
फ ः १, ११, १२, १३ ः २०८ ः ८ ः २००
ग ः २१, २३, २४, २७ ः १८१ ः २६ ः १५५
ह ः २०, ३०, ३१, ३२ ः ३६७ ः ३५ ः ३३२
एकूण ः ३२ ः १,९९३ ः ९९ ः १,८९४
------

आचारसंहिता उल्लंघन तक्रारींसाठी कक्ष
महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. या कालावधीत नागरिकांना आदर्श आचारसंहिता संदर्भात तक्रारी, सूचना अथवा माहिती तत्काळ नोंदविता यावी यासाठी आठही निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयनिहाय आचारसंहिता कक्षांचे संपर्क क्रमांक निवडणूक विभागाने प्रसिद्ध केलेत. नागरिकांनी थेट संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी तथा उपआयुक्त व्यंकटेश दुर्वास यांनी केले.

निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयनिहाय संपर्क क्रमांक
प्रभाग क्रमांक ः कार्यालयांचा पत्ता ः संपर्क क्रमांक
मध्यवर्ती कार्यालय ः महापालिका मुख्यालय ः ०२०-६७३३१२१७
प्रभाग १०, १४, १५, १९ ः हेडगेवार भवन, प्राधिकरण ः ०२०-६७३३१२१७
प्रभाग १६, १७, १८, २२ ः ब क्षेत्रीय कार्यालय, चिंचवड ः ९२७१०६६०८२
प्रभाग २, ६, ८, ९ ः क क्षेत्रीय कार्यालय, भोसरी ः ९२७१०६६०८५
प्रभाग २५, २६, २८, २९ ः ड क्षेत्रीय कार्यालय, रहाटणी ः ९२७१०६६०८८
प्रभाग ३, ४, ५, ७ ः लांडगे नाट्यगृह परिसर, भोसरी ः ९२७१०६६०९१
प्रभाग १, ११, १२, १३ ः घरकुल चिखली टाऊन हॉल परिसर ः ९२७१०६६०९४
प्रभाग २१, २३, २४, २७ ः ग क्षेत्रीय कार्यालय, थेरगाव ः ९२७१०६६१००
प्रभाग २०, ३०, ३१, ३२ ः मंडई दुमजली हॉल, कासारवाडी ः ९२७१०६६१०३
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT