पिंपरी-चिंचवड

आयटी पार्कसाठी दिलेल्या जमिनींचा पूर्ण मोबदला हवा

CD

पिंपरी, ता. २ ः हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्क उभारताना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने माण, मारुंजी, हिंजवडीतील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या. ज्यांना अद्याप पूर्ण मोबदला दिलेला नाही त्यांच्या जमिनी सरकारने परत कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
या मागणीचे निवेदन येथील शेतकरी स्वप्नील भानुसे यांनी नुकतेच मंत्रालयात दिले. आयटी पार्क विकसित करण्यासाठी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या यावेळी शेतकऱ्यांना योग्य मोबदल्यासोबतच येथे नोकरी, कामधंदा देण्याचेही आश्‍वासन मिळाले होते. प्रत्यक्षात हे आश्‍वासनही पूर्ण झालेले नाही. वाढीव रकमेसाठी शेतकऱ्यांचा एमआयडीसी विरोधात न्यायालयात खटला सुरू आहे. त्याचा निकाल प्रलंबित आहे. ज्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत, ते आता वृद्ध झालेले आहेत. ते मोबदल्याची वाट पाहत आहे. त्यामुळे गरजवंतांना त्यांच्या जमिनी परत द्याव्यात किंवा पूर्ण मोबदला द्यावा, अशी मागणी या निवेदनात भानुसे यांनी केली आहे.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT