पिंपरी-चिंचवड

रवी लांडगे यांची बिनविरोध निवड निश्चित

CD

पिंपरी, ता. १ : पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपचे उमेदवार रवी लांडगे यांची धावडेवस्ती-प्रभाग सहा मधून बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. त्यांच्या विरोधातील मनसे आणि अपक्ष अशा दोन उमेदवारांचे अर्ज छाननी प्रक्रियेत बाद ठरले, तर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या त्यांच्या पत्नी श्रद्धा लांडगे यांच्यासह एका अपक्ष उमेदवाराने माघार घेतली. त्यामुळे रवी लांडगे यांच्या बिनविरोध निवडीच्या अधिकृत घोषणेची औपचारिकता राहिली आहे.

प्रभाग सहामधून मनसेच्या उमेदवारासह पाच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अपक्ष उमेदवार प्रसाद ताठे यांचा अर्ज छाननीत बाद झाला. तर, मनसेचे उमेदवार नीलेश सूर्यवंशी यांचा अर्ज जात प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे रद्द करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष काळुराम लांडगे यांनी उमेदवारी अर्जच दाखल न केल्याने प्रभागातील राजकीय गणिते बदलली. त्यातच गुरुवारी (ता. १) अपक्ष उमेदवार श्रद्धा रवी लांडगे आणि प्रसाद ताठे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. परिणामी, या प्रभागात रवी लांडगे यांच्याविरोधात आता कोणताही उमेदवार राहिलेला नाही.
महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीतही लांडगे यांची बिनविरोध निवड झाली होती. भाजपचे दिवंगत शहराध्यक्ष अंकुशराव लांडगे यांचे पुतणे असलेले रवी यांनी गतवर्षी भोसरी विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना (ठाकरे) पक्षात प्रवेश केला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महिनाभरापूर्वी त्यांनी पुन्हा भाजपमध्ये घरवापसी केली. सलग दोनवेळा बिनविरोध निवडीची परंपरा त्यांनी कायम राखल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

USA Drone Threat: अमेरिकेच्या मंत्र्यांच्या घरावर ड्रोन; लष्करी तळावर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, 'एफबीआय’चा काय इशारा!

Latest Marathi News Live Update : पादुका दर्शनासाठी सज्ज होतोय 'भक्तीचा महाकुंभ'; वरळीच्या NSCI डोममध्ये उद्यापासून उत्सवाला होणार सुरुवात

Beed News: मानवत: घरासमोरील ऑटो रिक्षा पेटवली; १.४० लाखांचे नुकसान; पंधरा दिवसांतील दुसरी वाहन आग; कृष्ण मंदिर परिसर हादरला

Chhtrapati Sambhajinagar: वादळी पावसामुळे शहर अंधारात; ३०० महावितरण कर्मचारी रात्रभर दुरुस्तीवर

Iran political Crisis: इराणमध्ये संघर्षाचा पेच कायम; नेत्यांना मारण्याचे विपरित परिणाम होण्याचा इशारा!

SCROLL FOR NEXT