पिंपरी-चिंचवड

शिवसेना ठाकरे पक्षाच्या एकासह काँग्रेसच्या दोन उमेदवारांची माघार

CD

पिंपरी, ता. १ ः पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एका, तर काँग्रेसच्या दोन उमेदवारांनी गुरुवारी (ता. १) माघार घेतली. आता काँग्रेसचे ५६ उमेदवार रिंगणात राहिले आहेत.
काँग्रेसच्या प्रभाग दोनमधील ‘क’ जागेवरील जुनेद चौधरी व प्रभाग १५ मधील ‘ब’ जागेवरील शुभांगी शिंदे यांनी माघार घेतली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मोहम्मद खान यांनी प्रभाग १५ मधील ‘ब’ जागेवरून माघार घेतली. प्रभाग पाचमधील ‘ड’ जागेवरील अपक्ष उमेदवार सचिन लांडगे यांनी माघार घेतली. आमदार महेश लांडगे यांचे ते बंधू आहेत. या जागेवर भारतीय जनता पक्षाचे जालिंदर शिंदे उमेदवार आहेत.

भाजप-राष्ट्रवादी आमने-सामने
प्रभाग सहामधील क जागेवर केवळ भाजपच्या राजश्री लांडगे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रियंका लांडे उमेदवार आहेत. प्रभाग सातमधील ब जागेवर केवळ भाजपच्या सोनाली गव्हाणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुराधा लांडगे उमेदवार आहेत. त्यामुळे या जागांवर दुरंगी लढत होईल.


३८ उमेदवारांची माघार
अर्ज माघारीच्या पहिल्या दिवशी गुरुवारी (ता. १) ३८ जणांनी माघार घेतली. त्यांची अर्जसंख्या ४१ होती. तसेच, ९९ जणांचे अर्ज बाद झाले आहेत. त्यामुळे निवडणूक रिंगणात एक हजार ८५६ उमेदवार आहेत. अर्ज माघारीचा शुक्रवारी (ता. २) अखेरचा दिवस आहे.

यांनी घेतली माघार
उमेदवारी अर्ज माघारी घेणाऱ्यांमध्ये प्रभाग दोनमधील जुनेद चौधरी, अरिफ खान; प्रभाग तीनमधील रजनी भोसले; प्रभाग पाचमधील सचिन लांडगे, भरत शिंदे, प्रभाग सहामधील श्रद्धा लांडगे, प्रसाद ताठे; प्रभाग सातमधील शुभांगी लोंढे, प्रज्वल लोंढे; प्रभाग आठमधील पंकज पवार; प्रभाग नऊमधील राहुल वाघमारे, ॲड. दत्ता झुळूक, उत्तम कांबळे, अजय शेरखाने; प्रभाग नऊमधील राजेश नागोसे, दीपक म्हेत्रे, हनुमंतराव भोसले; प्रभाग १० मधील अश्विनी खंडेराव, रोहिणी रासकर; प्रभाग १४ मधील गुलामअली भालदार; प्रभाग १५ मधील संगीता काळे, शुभांगी शिंदे, स्मिता बागल, संगीता काळे; प्रभाग १७ मधील मनिषा वाल्हेकर; प्रभाग १८ मधील पूजा सराफ; प्रभाग २१ मधील कल्याणी साठे; प्रभाग २३ मधील साक्षी बारणे; प्रभाग २५ मधील विनय गायकवाड, मोनिका दर्शले, राम वाकडकर; प्रभाग २६ मधील ममता गायकवाड; प्रभाग २८ मधील जयनाथ काटे; प्रभाग २९ मधील राजू लोखंडे, मधुकर रणपिसे, अक्षय जगताप; प्रभाग ३१ मधील आरती आढाव यांचा समावेश आहे.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर 'नंदा देवी' मोठ्या दिमाखात भारतात दाखल! तुमच्या घरातला गॅसचा प्रश्न सुटला...

पत्नी देवीशाचा एक प्रश्न अन् सूर्यकुमार यादवच्या कारकीर्दिला मिळाली कलाटणी; T20 World Cup विजेत्या कर्णधाराने अखेर सिक्रेट सांगितले

Gas Cylinder Shortage : अष्टविनायक श्री बल्लाळेश्वर देवस्थानचे अन्नछत्र बंद; भाविकांच्या अन्नाचा प्रश्न ऐरणीवर, प्रसादाचा लाडू सुद्धा बंद

Gold Investment: युद्ध सुरू असतानाही सोन्याचे भाव का पडले? शेअर बाजार कोसळला तरी सोनं स्वस्त का? पुढे काय होणार? तज्ज्ञांचे मत

Latest Marathi News Live Update : मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT