पिंपरी-चिंचवड

ढगाळ हवामानामुळे पिकांवर रोगराईचे सावट

CD

सोमाटणे, ता.२ ः ढगाळ हवामानामुळे पिकावर रोगाचा धोका वाढला असून शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेणे आवश्‍यक झाले आहे. वातावरणात बदल झाला असून आकाशात ढग जमा झाल्याने पंधरा अंशाच्या खालील तापमानाचा पारा वाढला आहे. याचा परिणाम पिकावर होण्यास सुरवात झाली आहे, मोहरात आलेल्या आंब्यावर रोगामुळे तेलकटपणा वाढू लागला आहे. ज्वारी, गहू, हरभरा, वाटाणा, मसूर या पिकांसह भाजीपाला व फुलशेती यावरही रोगाचा धोका वाढला आहे. पावसामुळे भाताचे नुकसान झाल्याने उत्पादनात घट झाली. केवळ खर्च भागवण्याएवढे
उत्पादन झाल्याने शेतकरी संकटात सापडले. त्यातच ढगाळ हवामानामुळे शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे राहिले आहे.

पिकावर होणाऱ्या संभाव्य रोगाचा विचार करून कृषी विभागाने शेतकऱ्यांना रोगाच्या बंदोबस्तासाठी पिकानुसार किटकनाशक बाबत मार्गदर्शन करावे.
- बाळासाहेब केदारी, शेतकरी

बदलत्या हवामानाचा पिकावर परिणाम होऊ शकतो, यामुळे शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार औषध फवारणी करावी.
- नवीनचंद्र बोऱ्हाडे, कृषी सहायक पवनमावळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

YouTube Down Worldwide: जगभरातील लोकप्रिय व्हिडिओ प्लॅटफॉर्म you tube अचानक बंद

आजचे राशिभविष्य - 18 फेब्रुवारी 2026

Sahyadri Tiger Reserve: सह्याद्री व्याघ्र-लास्ट वाइल्डरनेसमध्ये सामंजस्य करार; मानव व वन्यजीव सहअस्तित्व होणार बळकट!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 18 फेब्रुवारी 2026

Sidharth Malhotra's Father Passes Away : सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन!, भावूक होत केली पोस्ट अन् म्हणाला...

SCROLL FOR NEXT