अजित पवार म्हणाले...
- शहरात लुटारूंच्या टोळ्या दिवसाढवळ्या वावरत आहेत
- शरद पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये विकासाला गती दिल्याचा दाखला
- शहरातील काहींच्या संपत्ती कशी काय वाढली? कुठून पैसा आला?
- त्यावेळच्या पदाधिकाऱ्यांनी कुत्र्याच्या नसबंदीतही पैसे खाल्ले
- भ्रष्टाचाराच्या राक्षसाचे दहन करण्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत
- आजवर जमीन माफिया, भंगार माफिया आता शहरात खोदाई माफिया
-------------
कर्जरोखे काढून कोट्यवधी कर्ज
‘‘महापालिकेच्या २०१७ पूर्वी सुमारे पावणेपाच हजार कोटींच्या ठेवी होत्या. आता त्या दोन हजार कोटींवर आल्या आहेत. या ठेवी वाढायला हव्या होत्या. इतकंच नव्हे, तर कर्जरोखे काढून कोट्यवधींचे कर्ज केले आहे. ‘रिंग’ करून पैसे लाटले गेले. रस्ते अरुंद केल्याने वाहतूक कोंडी वाढली आहे,’’ असे पवार म्हणाले.
भाजपची भूक राक्षसी
‘‘भाजपची राक्षसी भूक मला पाहवत नाही. सर्वत्र हफ्तेखोरी सुरू आहे. गेल्या नऊ वर्षांत भाजपच्या सत्ता काळात दादागिरी वाढली. मी पुरावे देईन. कोणावरही बिनबुडाचे आरोप करणार नाही,’’ अशा शब्दांत पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
सत्तेची मस्ती आणि नशा
अजित पवारांनी यावेळी भाजपच्या स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांवर टीका करत धुलाई केली. ‘‘त्यांना
सत्तेची मस्ती आणि नशा आली आहे. आमच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे,’’ असा दावाही त्यांनी केला.