पिंपरी-चिंचवड

गुन्हे वृत्त

CD

तीन कारवायांत सात लाखांचा गांजा जप्त
पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलिसांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवायांमध्ये एकूण सात लाख ८६६ रुपये किमतीचा गांजा जप्त केला, तसेच तिघांना अटक केली. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने मामुर्डी येथे ओमकार हरी इंगवले (रा. म्हेत्रेवस्ती, कृष्णानगर, चिखली), आयुष राजेंद्र भट (रा. सेक्टर १८, शिवतेनगर, चिखली) यांना अटक केली असून किशोर नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला. या आरोपींकडील चार लाख पाच हजार रुपये किमतीचा गांजा जप्त झाला. आकुर्डीतील बीआरटी मार्गिकेवर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने संजू गिरिधारी तायडे (रा. अशोक नगर, जि. अकोला) याला अटक केली. त्याच्याकडून दोन लाख ५४ हजार ९०० रुपये किमतीचा गांजा जप्त झाला. निगडी पोलिसांनी ओटास्कीम परिसरातील मोकळ्या जागेत कमलसाहब मेहबूब बागवान (रा. मिलिंदनगर, निगडी) याला अटक केली. त्याच्याकडून ४० हजार रुपये किमतीचा गांजा जप्त झाला.
-----------
नफ्याच्या आमिषाने ६७ लाखांना गंडा
पिंपरी : शेअर बाजारात जादा नफा मिळवून देण्याच्या आमिषाने ताथवडेमधील एकाची ६६ लाख ८७ हजार रुपयांची फसवणूक करण्‍यात आली. संबंधित ३६ वर्षीय व्यक्तीने सायबर पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला. आरोपींनी सोशल मीडियावरून संपर्क साधून फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांना विविध बँक खात्यांत गुंतवणुकीच्या नावाखाली रक्कम जमा करण्यास सांगितले. फिर्यादीने टप्प्याटप्प्याने रक्कम रुपये जमा केली. आरोपींनी गुंतवणुकीवरील नफा काढण्यासाठी त्यांच्याकडे १५ टक्के कर मागितला. मात्र नंतर, गुंतवणूक केलेली रक्कम व नफा दिला नाही.
----

जुन्या भांडणावरून तरुणाला मारहाण
पिंपरी : जुन्या भांडणाच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत रिक्षाचालक तरुण गंभीर जखमी झाला. निगडीतील ओटास्कीम येथे हा प्रकार घडला. माहुल बाबासाहेब जावळे (रा. ओटा स्कीम, निगडी) असे जखमीचे नाव आहे. त्‍यांनी निगडी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी किशोर जेटीचोर (रा. दळवीनगर, ओटा स्कीम, निगडी) याच्यावर गुन्‍हा दाखल केला. फिर्यादी मित्रांसोबत उभे असताना आरोपी तेथे आला. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या वादाच्या कारणावरून तसेच पोलिसात तक्रार देतो का, असे म्हणत त्यांनी धमकी देत धक्काबुक्की केली. त्यानंतर लोखंडी वस्तूने त्याला मारहाण करण्यात आली.
-----------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2026 Prize Money : भारतीय संघाला २४.२७ कोटी; पाकिस्तानच्या वाट्याला चिचुका, ICC ने जाहीर केली बक्षीस रकमेची विभागणी

नागपूर-रत्नागिरी महामार्ग ८ पदरी असणार का? शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाची महत्त्वाची माहिती देत एकनाथ शिंदेंनी उत्तरच सांगितलं!

LPG Supply in India : युद्धामुळे LPG चा पुरवठ्याचं संकट; इंटरनेटवरही होणार परिणाम?

Pune crime cctv: पुणं हादरलं! मित्राची थट्टा केली म्हणून आला राग, सपासप वार करत केला खून! सीसीटीव्ही व्हायरल

'मुरांबा' मालिकेत मोठा ट्विस्ट; अक्षय आणि रमाच्या आयुष्यात 'ती' पुन्हा येणार; प्रेक्षक मात्र संतापले

SCROLL FOR NEXT