पिंपरी-चिंचवड

साई किरण, भारत, योगेश यांची विजयी सुरुवात

CD

पिंपरी, ता.३ ः औद्योगिक क्रीडा संघटनेच्यावतीने ताथवडे येथे आयोजित ६२ व्या बॅडमिंटन स्पर्धेला शनिवारी (ता.३) सुरुवात झाली. पुरुष एकेरी गटाच्या पहिल्या फेरीत साई किरण इला (इमर्सन इंडिया), भारत चौधरी (ऑप्टिमायझर), योगेश मठपती (बजाज ऑटो आकुर्डी) आदींनी तर महिला एकेरीत आकांक्षा दरगर (बजाज ऑटो, आकुर्डी), रिचा ढाणे (फॉर्विया), माधुरी कडाने (सहाना इंजिनिअरिंग) आदींनी विजय मिळविले.
स्पर्धेचे उद्‍घाटन अल्ट्रा कॉर्पोटकचे संचालक यश भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी अल्ट्रा कॉर्पोटकचे सहयोगी संचालक दीपक शेट्टी, अमित काळे (डीजीएम-एचआर), व्यवस्थापक धीरज अधिकारी (एचआर), आशिष भोसले, औद्योगिक क्रीडा संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र कदम, सचिव वसंत ठोंबरे, सहखजिनदार विजय हिंगे, स्पर्धा प्रमुख हरी देशपांडे, अमित कदम, सँडविक एशिया क्रीडा समितीचे दुष्यंत गायकवाड, अजित कुंभार, परबत कुंभार, ज्येष्ठ खेळाडू भानुदास कुलकर्णी, सत्यवान शिवले, सौरभ गवादे आदी उपस्थित होते. संघटनेचे खजिनदार प्रदीप वाघ यांनी औद्योगिक क्रीडा संघटनेची माहिती खेळाडूंना दिली. नरेंद्र कदम, वसंत ठोंबरे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.

पहिल्या फेरीतील काहीं निकाल पुढील प्रमाणे ः
पुरुष एकेरी - साई किरण इला (इमर्सन इंडिया) वि.वि. अजिंक्य नातू (सिंडुलर इंडिया) ३०-५. भारत चौधरी (ऑप्टिमायझर) वि.वि. दर्शन काळे (बजाज ऑटो, चाकण) ३०-१५. योगेश मठपती (बजाज ऑटो, आकुर्डी) वि.वि. भवानी सिंग (मिंडा कार्पोरेशन) ३०-२२.
पुरुष दुहेरी - गौरांग गुजराती, प्रल्हाद पत्की (थरमॅक्स) वि.वि. मंजुनाथ नायडू, रितेश गरड (मॅग्नम फोर्ज) ३०-२७.
रोहित बट्ट, स्वप्नील फुलसुंदर (ॲटलास कॉपको) वि.वि. प्रतीश कांबळे, सुमीत गिरी (वोस्टलपाईन) ३०-१०.
मिश्र दुहेरी - संदीप कामन्ना, आदिती पाठक (टीकेआयएल) वि.वि. फाणी, मालविका (प्राज इंडस्ट्रीज) ३०-१९.
महिला एकेरी - आकांक्षा दरगर (बजाज ऑटो, आकुर्डी) वि.वि.अनुष्का एम. (एसकेएफ) ३०-२६.
रिचा ढाणे (फॉर्विया) वि.वि. सीमा जावळेकर (टाटा मोटर्स) ३०-१७. माधुरी कडाने (सहाना इंजिनिअरिंग) वि.वि. अदिती पाठक (टीकेआयएल) ३०-२४.


तब्बल ४१ कंपन्यांचा सहभाग
या स्पर्धेस अल्ट्रा कॉर्पोटेक, टाटा मोटर्स, बजाज ऑटो (आकुर्डी), बजाज ऑटो (चाकण), मिंडा कॉर्पोरेशन, फिलिप्स, शिंडलेर, ॲटलास कॉपको, टीई कनेक्टिव्हिटी, अटॉस, फॉर्विया, फ्लीटगार्ड फिल्टर्स, टाटा टेक्नॉलॉजी, अशा एकूण ४१ कंपन्यांच्या ३६० महिला व पुरुष खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP–AIMIM Alliance: ‘बटेंगे तो कटेंगे’सारखे घोषवाक्य देणाऱ्या भाजपची AIMIM सोबत युती, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट!

शिक्षणाधिकाऱ्यांचाच अभ्यास कच्चा, आदेशाचा चुकीचा अर्थ काढला; राज्यात शिक्षकांना दिल्या कुत्रे मोजण्याच्या सूचना

T20 World Cup 2026 : न्यूझीलंडचा संघ जाहीर; रोहित शर्माचा मित्र कर्णधार, एकाच डावात १९ सिक्स मारणाराही फलंदाजही परतला

Asaduddin Owaisi:‘१५ मिनिटां’चा इतिहास आहे, १५ तारखेला पुन्हा इतिहास घडवा: खासदार असदुद्दीन ओवेसी; राजकारणात नवा अध्याय लिहा!

अंबरनाथमध्ये भाजप-काँग्रेसची युती, कमळाला हाताचा आधार; शिवसेना शिंदे गट विरोधी बाकावर

SCROLL FOR NEXT