पिंपरी-चिंचवड

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य आजही प्रेरणादायक ः बगाडे

CD

पिंपरी, ता. ३ : ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी भारतात महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून समाजपरिवर्तनाची चळवळ उभी केली. शिक्षणाच्या माध्यमातून स्त्री-पुरुष समानता, सामाजिक न्याय व मानवी मूल्यांची जपणूक त्यांनी प्रभावीपणे केली. त्यांचे व्यापक कार्य आजही आपल्याला प्रगती, समता व संवेदनशील समाज घडविण्यासाठी प्रेरणादायक ठरते. त्यांच्या विचारांचा वारसा जपत पिंपरी चिंचवड महानगरपालिका सर्वसमावेशक विकासासाठी कटिबद्ध आहे,’ असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी केले.
भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस त्यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.
पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मोशी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. महिला शिक्षक दिनाचे औचित्य साधून महापालिकेने ‘मी सावित्री’ या एकपात्री नाट्यप्रयोगाचे आयोजन महापालिकेच्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे केले होते.
------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपची राज्यसभेची दुसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातून रामदास आठवले, विनोद तावडेंसह चौघांना संधी

Latest Marathi News Live Update : यवतमाळच्या नेर तालुक्यात बिबट्या विहरीत पडला

भाजप महाराष्ट्रातून राज्यसभेवर देणार महिला उमेदवार, राष्ट्रपती द्रौपदी मूर्मूंच्या निकटवर्तीय; तातडीनं बोलावलं मुंबईला

रक्तातील कावीळ कशी होते? कोणत्या अवयवावर ताण येतो? 'या' 6 लक्षणांकडे दुर्लक्ष म्हणजे मृत्यूला आमंत्रण!

BEST Bus Accident: भांडुप बस अपघात प्रकरणी धक्कादायक खुलासा, चालकाने प्रशिक्षणच पूर्ण केलं नाही; ७०४ पानी आरोपपत्र

SCROLL FOR NEXT