पिंपरी-चिंचवड

जिल्हा रुग्णालयासाठी नवीन शवपेट्यांची खरेदी होणार

CD

सकाळ इम्पॅक्ट

पिंपळे गुरव, ता.१० ः सांगवी येथील जिल्हा रुग्णालयाच्या शवागारातील दोन जुन्या निरुपयोगी शवपेट्या काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ती पूर्ण झाल्यावर जिल्हा नियोजन समितीच्या अनुदानातून नवीन शवपेट्या खरेदी करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच अतिरिक्त दोन मृतदेह क्षमतेच्या शवपेट्या शवागारात बसविण्यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविण्यात आले आहे.
सांगवी येथील जिल्हा रुग्णालयातील विविध त्रुटींवर ‘सकाळ’मध्ये ४ ते ८ फेब्रुवारीपर्यंत ‘जिल्हा रुग्णालय व्हेंटिलेटरवर’ ही पाच दिवसीय वृत्तमालिका प्रसिद्ध करण्यात आली. चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून हा प्रश्न विधानसभेत उपस्थित केल्याने प्रशासन हलले आहे. रुग्णालयातील शीतपेट्या, शवागार व्यवस्था आणि साहित्य वापराबाबत सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
विधानसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिले. त्यानुसार, सांगवी जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात एकूण तीन शवपेट्या आहेत. त्यामध्ये ४ मृतदेह क्षमतेच्या दोन आणि २ मृतदेह क्षमतेची एक शवपेटी आहे. त्यापैकी ४ मृतदेह क्षमतेची दोन शवपेट्या अत्यंत जुन्या झाल्यामुळे दुरुस्त होऊ शकत नसल्याचा अहवाल तांत्रिक तपासणीत समोर आला. शवागार पूर्णतः बंद नाही. दोन मृतदेह ठेवण्याच्या क्षमतेची शवपेटी कार्यरत आहे.

परस्पर विल्हेवाट नाही
जिल्हा रुग्णालयात दररोज सरासरी सहा ते सात शवविच्छेदन केले जाते. मृतांच्या नातेवाईकांची गैरसोय होऊ नये म्हणून पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील शवपेट्यांचा समन्वयाने वापर केला जात असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले. रुग्णालयातील कोणत्याही निरुपयोगी यंत्रांची परस्पर विल्हेवाट लावण्यात आलेली नाही. त्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून त्यामार्फत कार्यवाही केली जाते.

सरकारचे म्हणणे काय ?
- शवविच्छेदन विभागात केवळ एकच कायम कर्मचारी उपलब्ध
- यापूर्वी तीन कर्मचारी कार्यरत; त्यापैकी एकाचा मृत्यू. तर दुसरा कर्मचारी सेवानिवृत्त
- मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करताना कर्मचाऱ्यांकडून पैशांची मागणी होत असल्याबाबत लेखी तक्रार प्राप्त नाही. मात्र, वृत्तमालिकेच्या पार्श्वभूमीवर चौकशी
- राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत रोजंदारीवर कार्यरत संबंधित कर्मचाऱ्याची सेवा समाप्त
- शवविच्छेदनासाठी आवश्यक कापड, बॉडी बॅग आणि कॉटनसारखे साहित्य गायब होत असल्याचा इन्कार
- रुग्णालयातील सर्व यंत्रसामग्री व साहित्याची जडसंग्रह नोंदवहीत नोंद. संगणकीय नोंदही ठेवण्यात येत असल्याचे नमूद

माझ्या नातेवाईकाचा मृतदेह जिल्हा रुग्णालयाच्या शवागारातील शीतगृहात ठेवला होता. पण, ते नादुरूस्त असल्याने मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घेऊन जाताना त्याची अवस्था वाईट होती. जिल्हा रुग्णालयाच्या संवेदनाशून्य प्रशासनाला त्याचे काही देणे घेणे नव्हते. मात्र विधानसभेत हा प्रश्न लावून धरल्याने भविष्यात मृतदेहाची अशी अवहेलना होणार नाही.
- विकी सिद्धू, मृताचे नातेवाईक


सध्या चार मृतदेह ठेवता येतील, अशा शीतपेट्यांची व्यवस्था तत्काळ करण्यात येईल. याबाबत आरोग्यमंत्र्यांनी चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांची भेट घेऊन त्यांना प्रत्यक्ष पाहणी करण्याबाबत सांगितले आहे. तसेच सहा मृतदेह ठेवता येतील, अशा सहा शीतपेट्यांचे प्रस्ताव तयार करण्यास सांगितले आहे. त्यानुसार भविष्यात एकूण दहा मृतदेह ठेवता येतील, अशी शीतपेट्यांची व्यवस्था उभारण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
- डॉ. भगवान पवार, उपसंचालक, आरोग्य विभाग, पुणे मंडल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Student Emotional Story : 'आई-वडील या जगात नाहीत..', चिमुरड्याचे 'ते' शब्द ऐकून डोळ्यात येईल पाणी; शिक्षकानं त्याच्यासोबत जे केलं, ते पाहून तुम्हीही कराल सलाम!

Mutual Fund: स्मॉल-कॅप, मिड-कॅप की लार्ज-कॅप कोणता म्यूचुअल फंड देतो जास्त रिटर्न? आकडेवारी काय सांगते

कॅमेरासमोर तरी पूर्ण कपडे घालून योगा करत जा... म्हणणाऱ्या नेटकऱ्याला ऐश्वर्या नारकरांचं उत्तर; म्हणाल्या, तुमचा फोकस का...

धक्कादायक! झोमॅटोवरून बिर्याणी मागवली; अन्नात कुत्र्याचा पाय सापडला अन्... संतापजनक व्हायरल व्हिडिओ समोर

IPL 2026 Update: अजिंक्य रहाणेने सोडले KKR चे कर्णधारपद? व्हायरल पोस्टने उडवली खळबळ, त्यात लिहिलंय...

SCROLL FOR NEXT