पिंपरी, ता.१२ ः चिंचवडगावातील श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळाच्यावतीने १६ मार्च २०२६ पासून पाच दिवसीय श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सवाचे आयोजन केले आहे.
स्वामी समर्थ मठाच्या प्रांगणात पहाटे ४:३० वाजता ‘श्रीं’चा पंचामृत अभिषेक व पूजा आणि सहा वाजता उत्सव कलश स्थापनेने प्रारंभ होईल. सायंकाळी सहा वाजता अवधूत गांधी यांचा गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. मंगळवारी (ता. १७) सायंकाळी सहा वाजता भक्तिगंधर्व मुकुंद बादरायणी आणि सहकारी स्वरसमर्थ अभंगवाणी सादर करतील. बुधवारी (ता.१८) सायंकाळी सहा वाजता योगेश तपस्वी बहारदार भक्तिगीते सादर करतील. गुरुवारी (ता. १९) सायंकाळी सहा वाजता आशुतोष झा यांचे ऐतिहासिक शिवशंभो गाथा व्याख्यान होईल. शुक्रवारी (ता. २०) सायंकाळी सहा वाजता राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त गायिका सावनी रवींद्र ‘घन अमृताचा’ गीतांचा कार्यक्रम सादर करणार आहे.
उत्सवात दररोज पहाटे ४:३० वाजता अभिषेक, पूजा आरती, सकाळी ८:३० ते दुपारी चार वाजेपर्यंत स्वामी स्वाहाकार, श्री गुरुलीलामृत ग्रंथ पारायण, दुपारी १२ वाजता महानैवेद्य व आरती, भजनसेवा, कीर्तन, सामुदायिक रुद्राभिषेक इत्यादी धार्मिक विधी होतील. शुक्रवारी दुपारी १२:३० ते तीन या वेळेत महाप्रसाद वाटप होणार आहे. या सोहळ्यातील सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष दिनकर चिंचवडे (पाटील) यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.