पिंपरी, ता. ११ : घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरचे वाढलेले भाव, आणि व्यावसायिक सिलिंडरचा बंद करण्यात आलेला पुरवठा यामुळे आणि भाकरीचीही भाववाढ झाली आहे. प्रति चपातीमागे दोन ते पाच रुपयांनी दरवाढ केली आहे. याचा फटका सामान्य ग्राहकांना बसला आहे.
शहर-परिसरात मोठ्या संख्येने पोळी भाजी केंद्र आहेत. तर, काही हॉटेलला चपाती केंद्रातून चपाती आणि भाकरीचा पुरवठा होतो. या व्यावसायिकांना इंधनाचा खर्च भागवण्यासाठी चपातीची किंमत वाढवावी लागत आहे. ज्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. ज्यांचा व्यवसाय गॅस सिलिंडरवर अवलंबून आहे. मात्र, त्यांच्याकडे एक-दोन दिवस पुरेल इतकाच गॅस शिल्लक आहे. तसेच ‘‘पुढील आदेश येईपर्यंत नवा सिलिंडर मिळणार नाही’’ असे एजन्सीकडून सांगण्यात आले आहे. काही हॉटेल व्यावसायिकांनी गॅस टंचाईमुळे पर्यायी इंधनाचा वापर सुरू केला आहे.
ग्राहकांसाठी एकच भाजी
‘‘जे पदार्थ एकाचवेळी शिजवून तयार करता येतात, असे पदार्थच ग्राहकांना देता येणे शक्य आहे. मात्र, ऐनवेळी तयार करावे लागणारे पदार्थ गॅस तुटवड्यामुळे देणे बंद केले आहे,’’ असे पोळी भाजी केंद्र चालकांनी सांगितले. त्यामुळे इतर वेळी चार भाज्यांचे पर्याय उपलब्ध असायचे, आता एकाच भाजीवर ग्राहकांना समाधान मानावे लागणार आहे.
एलपीजी टंचाईमुळे व्यवसायावर परिणाम झाला आहे. गॅस पुरवठा एजन्सीने अनेक खानावळचालकांचे मोबाइल नंबर ब्लॅक लिस्टमध्ये टाकले आहेत. पोळी भाजी केंद्र बंद ठेवण्याची वेळ येऊ शकते. चपाती सेंटर बंद केल्यावर आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे सरकारने तातडीने उपाययोजना करावी.
- विलास जाधव, चालक, सिद्धीविनायक चपाती सेंटर
जे सिलिंडर उपलब्ध आहेत, ते जास्त महाग आहेत. अधिकृत किमतीपेक्षा जास्त दराने विकले जात आहेत. त्यामुळे सिलिंडर मिळाला तरी तोटा सहन करून केंद्र सुरू ठेवावे लागणार आहे. त्यामुळे या युद्धातून सरकारने काही ना काही मार्ग काढावा.
- इस्रायल महंमद अली, व्यावसायिक, अजमेरा कॉलनी
PNE26W02774
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.