पिंपरी-चिंचवड

रोजंदारीवरील कामगारांवर उपासमारीची वेळ

CD

चिखली, ता. ११ : गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे चिखली भागांत अवैध गॅस विक्रेते आणि गॅस वितरकांच्या डिलिव्हरी बॉयकडून घरगुती ग्राहकांची लुटमार सुरू झाली आहे. चिखली, तळवडे, भोसरी एमआयडीसीमधील रोजंदारीवरील कामगारांवर उपासमारीची वेळ येऊ लागली आहे.
आखाती युद्धामुळे गॅस सिलिंडर पुरवठ्यावर परिणाम झाला असून मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू झाला आहे.
गॅस संपल्यानंतर गॅस बुकिंग नंबर डायल केल्यास नंबर अस्तित्वात नाही, असे घरगुती ग्राहकांना ऐकवले जात आहे. डिलिव्हरी बॉयकडून नागरिकांना गॅस मिळतो. मात्र, त्यासाठी तब्बल दोन ते अडीच हजार रुपये मोजावे लागत आहेत. अनेक परप्रांतीय त्याचबरोबर तरुण मुले चिखली, तळवडे, भोसरी आणि पिंपरी एमआयडीसीमध्ये रोजंदारीवर काम करतात. त्यांच्याकडे गॅसजोड नसतो. त्यामुळे त्यांना अवैधरीत्या गॅस विक्री करणाऱ्याकडूनच गॅस विकत घ्यावा लागतो. पूर्वी अशा व्यक्तींना पाच किलो गॅससाठी ७०० ते ८०० रुपये मोजावे लागत होते. मात्र, आता त्यांना पाच किलोच्या गॅससाठी एक हजार ते दीड हजार रुपये मोजावे लागत आहेत. याबाबत मोशी तसेच चिंचवड येथील गॅस एजन्सीशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

गॅस संपल्यानंतर बुकिंग करता येत नव्हते. त्याचबरोबर गॅस एजन्सीकडे चकरा मारूनही गॅस मिळाला नाही. गॅस नसल्याने उपासमारीची वेळ कुटुंबावर आली. त्यामुळे दोन दिवसांंपूर्वी २ हजार रुपये देऊन डिलिव्हरी बॉयकडून गॅस घेतला.
- रामसिंग राजपूत, चिखली

मी बॅचलर मुलांबरोबर राहतो. अवैध विक्रेत्याकडून पाच किलो गॅस भरून घेतो. मात्र त्यासाठी आता तब्बल दीड हजार रुपये मोजावे लागत आहेत.
- उमेश यादव, मोरे वस्ती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

Pune Traffic: पुणेकर झाले पोलिस! ४० लाख नागरिकांनी कमावून दिले १२ कोटी; ‘पीटीपी’ला राष्ट्रीय पुरस्कार

Pune Fraud News : बांधकाम व्यावसायिक महिलेची पावणेसहा कोटींची फसवणूक; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT