पिंपरी-चिंचवड

शहरात कर्करोग रुग्णालयाच्या उभारणीस मुहूर्त

CD

पिंपरी, ता. ११ ः पिंपरी-चिंचवड शहरातील कर्करोगग्रस्त रुग्णांना अल्प दरात उपचार मिळावेत यासाठी महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या कर्करोग रुग्णालयाच्या कामाला अखेर मुहूर्त लागला आहे. या कामाचा कार्यारंभ आदेश आला आहे. थेरगाव रुग्णालयाच्या शेजारील महापालिकेच्या जागेत लवकरच काम सुरू होईल. दोन वर्षांमध्ये इमारत बांधून पूर्ण होणार असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिली.
कर्करोगाच्या रुग्णांचे वाढते प्रमाण, त्यावरील उपचारांचा होणारा लाखो रुपयांचा खर्च, गरीब व सर्वसामान्य रुग्णांना खासगी रुग्णालयांचे न परवडणारे या कारणांमुळे महापालिकेने कर्करोग रुग्णालय उभारावे अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. यासाठी महापालिकेने मार्च २०२४ मध्ये निविदा काढली होती. मात्र, त्यास प्रतिसाद मिळाला नाही. तीनवेळा मुदतवाढ दिल्यानंतर एकच ठेकेदार सहभागी झाला. त्याला काम देण्यात आले. सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर हे रुग्णालय उभारले जात आहे. ठेकेदाराला कार्यारंभ आदेश देण्यात आला.

असे असेल रुग्णालय
ठिकाण ः थेरगाव रुग्णालयाच्या शेजारी
एकूण जागा ः ३५ गुंठे
इमारत ः ११ मजली
क्षमता ः १०० खाटा
उपचार ः केमोथेरपी, रेडिएशन थेरपी, शस्त्रक्रिया, समुपदेशन
एकूण खर्च ः १५० कोटी
ठेकेदाराला देण्यात आलेली रक्कम ः ६० कोटी
---

या आहेत सुविधा
पिंपरी चिंचवड शहरात कामगार व कष्टकरी वर्गाची संख्या मोठी आहे. या वर्गातील रुग्णांना या रुग्णालयात एकाच छताखाली सर्व सेवा मिळणार आहेत. हे रुग्णालय फुफ्फुस, कोलोरेक्टल, प्रोस्टेट, स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोग याशिवाय विविध प्रकारच्या कर्करोगावरील उपचारांसाठी सुसज्ज असणार आहे. रुग्णालयामध्ये लिनियर एक्सीलरेटर्स, ब्रेकीथेरपी युनिट्स आणि पीईटी-सीटी स्कॅनची सुविधाही दिली जाणार आहे. येथे दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधांचे दर महापालिकेने निश्‍चित केले आहेत. त्यामुळे रुग्णांना अल्पदरात उपचार मिळतील.
---
थेरगाव येथील कर्करोग रुग्णालय हे पीपीपी तत्त्वावर उभारण्यात येणार आहे. त्यासाठी अंदाजे १५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी ६० कोटी रुपये ठेकेदाराला देण्यात आले आहेत. यामध्ये रुग्णालयाच्या उभारणीपासून ते तेथील सामग्री खरेदी, कर्मचारी नेमणे हे सर्व काही ठेकेदारामार्फत केले जाईल. दोन वर्षांत हे काम पूर्ण होईल.
- डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: पुणे शहर ठप्प! पावसाने रस्ते जलमय, प्रमुख चौकांमध्ये वाहतूक विस्कळित

Mumbai Agra Highway : मुंबई-आग्रा महामार्गावरील 'या' कोंडीतून होणार कायमची सुटका! राणेनगरमध्ये नक्की काय बदलणार? पाहा महत्त्वाची अपडेट

ICC Ranking: जसप्रीत बुमराहला जबरदस्त धक्का... मॅट हेन्रीने न्यूझीलंडचा ३६ वर्षांचा दुष्काळ संपवला; Joe Root पुन्हा टॉपर ठरला

Kolhapur Football : विषय हार्ड, लय भारी...; फिफाने घेतली कोल्हापूरच्या फुटबॉलची दखल, रोनाल्डो, नेमारच्या फोटोंना दिल्या मराठी कमेंट

लग्नपत्रिकेवर वधु-वरांची जन्मतारीख बंधनकारक, राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT