पिंपरी-चिंचवड

नव्या मिळकती शोधा; मानधन घ्या

CD

पिंपरी, ता. ११ ः शहरातील जलवाहिन्या, पथदिव्यांची दुरुस्ती व देखभाल; दफनभूमी सुरक्षा नियुक्ती; मिळकतकराची देयके वाटप करताना नवीन मिळकती शोधणाऱ्या महिलांना मानधन देणे यांसह विविध विषयांना महापालिकेच्या स्थायी समिती सभेने बुधवारी मंजुरी दिली.
स्थायी समितीची सभा अध्यक्ष अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसचिव मुकेश कोळप, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे यांच्यासह स्थायी समिती सदस्य व अधिकारी उपस्थित होते. आर्थिक वर्ष २०२६-२७ चे मिळकतकर देयके बचतगटातील महिलांमार्फत वितरित केली जाणार आहेत. त्यादरम्यान नवीन मिळकती शोधल्यास मानधन देण्याचा विषय उपसूचनेद्वारे मंजूर करण्यात आला.
तसेच, ‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण’ योजनेचे अर्ज बचत गटांतील माहिलांमार्फत भरून घेतलेल्या संस्थेस जुलै ते सप्टेंबर २०२४ या कालावधीतील प्रोत्साहन भत्ता देणे, शहरातील पाणी व नद्यांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करणे, घरकुलापासून जाधववाडी पंप हाऊसपर्यंत जलवाहिनी टाकणे, कुदळवाडी एसटीपी ते लक्ष्मी चौकापर्यंत जलवाहिनी टाकणे, विविध विद्युत विषयक कामे करणे, चौकांचे सुशोभीकरण, निगडीत इव्ही चार्जिंग स्टेशन उभारणे, पाण्याच्या टाक्यांची शास्त्रोक्त पद्धतीने साफसफाई व स्वच्छता करणे, भामा आसखेड धरणावरील अशुद्ध जलउपसा केंद्र ते नवलाख उंबरे ब्रेकप्रेशर टाकीपर्यंत १७०० मिलिमीटर व्यासाची आणि चिखली जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत १४०० मिलिमीटर व्यासाची वाहिनी टाकणे, नगरसचिव विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांची रजा मंजुरी आदी विषयांना मान्यता देण्यात आली.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

भेटीसाठी आता अपॉइंटमेंट घ्यावी लागते, स्वतःची ओळख सांगावी लागते... अजित पवारांच्या आठवणीत राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची खंत

Pune Bengaluru Highway : कराड उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात! कोल्हापूर-पुणे मार्गावर उद्यापासून वाहनांची चाचणी; कधी होणार पूर्ण खुला?

Ketan Agarwal Killed Case : गुगलवर शोधले खून करण्याचे पर्याय;गडावरून ढकलण्याचा केला होता सराव

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

SCROLL FOR NEXT