पिंपरी-चिंचवड

गुन्हे वृत्त

CD

संगणक अभियंत्याला २९ लाखांचा गंडा
पिंपरी : नामांकित कंपनीत वरिष्ठ संगणक अभियंता नोकरी लावण्याच्या आमिषाने एका तरुणाची २९ लाख १६ हजार ४७२ रुपये रुपयांना फसवणूक करण्यात आली. थेरगावमधील बेलठिकानगरमधील श्रीसाई पार्क कॉलनीत हा प्रकार घडला. याप्रकरणी संबंधित तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार वाकड पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला. आरोपीने फिर्यादीला सबस्क्रिप्शन चार्जेस, खाते उघडणे, एफ-६ फॉर्म, किट ॲक्टिव्हेशन आणि सिक्युरिटी प्रोसेस अशा वेगवेगळ्या कारणांसाठी ऑनलाइन पैसे भरण्यास भाग पडले. नंतर त्याला नोकरी लावण्यात आली नाही.
---------

तरुणीची ९३ हजारांना फसवणूक
पिंपरी : तरुणीचा विश्वास संपादन करून तिची सुमारे ९३ हजार रुपयांना ऑनलाइन फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. चऱ्होली बुद्रुकमध्ये हा प्रकार घडला. या प्रकरणी एका महिलेने दिघी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तन्मय अमोल पांडे (रा. हिंजवडी, मूळ यवतमाळ) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्या साथीदारांवरही गुन्हा दाखल केला. आरोपीने फिर्यादीच्या भाचीशी इंस्टाग्रामवर ओळख वाढवून तिचा विश्वास संपादन केला.
तिला ‘एम. परिवहन’ या ॲपची लिंक पाठवली. फिर्यादीने ते ॲप डाऊनलोड करताच आरोपीने तिच्या मोबाईलचा ताबा मिळवून बँक खात्यातून ९२ हजार ७९४ रुपये काढून घेतले.
-----------------------------

पिस्तूल बाळगल्याने एकाला अटक
पिंपरी : पिस्तूल बेकायदारित्या बाळगल्या प्रकरणी सांगवी पोलिसांनी जुनी सांगवी एका तरुणाला अटक केली. रवींद्र ऊर्फ रवी बापू ससाणे (रा. औंध, पुणे) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीचे पिस्तूल आणि एक हजार रुपये किमतीचे काडतूस जप्त केले.
--------------------------------------------------------
गॅस रिफिलिंगमुळे एकावर गुन्हा
पिंपरी : घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून इतर सिलिंडरमध्ये बेकायदारित्या गॅस भरणाऱ्या एका व्यक्तीवर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने कारवाई केली. डुडुळगाव येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये ही कारवाई झाली. महेश मनमत स्वामी (रा. डुडुळगाव) असे आरोपीचे नाव आहे. तो स्वतःच्या फायद्यासाठी लोकांच्या जीविताला धोका निर्माण होईल असे कृत्य करीत होता.
-----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

leopard Attack: हृदयद्रावक घटना! चार वर्षांच्या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू; गोंदियात जीव मुठीत धरून मुले घरातच, सहानंतर सामसूम!

Latest Marathi News Live Update : बीडच्या ऊसतोड मजूर गणेश डोंगरे यांच्या कुटुंबाला न्याय; आंदोलनानंतर कारखान्याकडून २१ लाखांची मदत

Ladki Bahin Yojana : काँग्रेसच्या पत्रानंतरही मकर संक्रातीला लाडक्या बहीणींना पैसं मिळणार? CM फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर देत विषयच मिटवला...!

IND vs NZ, 1st ODI: शुभमन गिलने जिंकला टॉस; भारताच्या संघात ६ गोलंदाजांची निवड, पाहा प्लेइंग इलेव्हन

Aquarius Yearly Horoscope : कुंभ राशीला साडेसातीचा त्रास, पण यंदाच्या वर्षात नेतृत्व गुण उजळतील

SCROLL FOR NEXT