पिंपरी-चिंचवड

सहावी, आठवीच्या अभ्यासक्रमात आता आयुर्वेदाचे धडे

CD

पिंपरी, ता. ९ ः ‘नवीन शैक्षणिक धोरण २०२०'' नुसार (एनईपी) अभ्यासक्रमांमध्ये बदल होत आहेत. त्याच धर्तीवर राज्य अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आता अभ्यासक्रमात आयुर्वेदाचा समावेश झाला आहे. त्यानुसार ''एनसीईआरटी''ने सहावी आणि आठवीच्या विज्ञान अभ्यासक्रमात आयुर्वेदावरील प्रकरणे समाविष्ट केली आहेत.
येत्या शैक्षणिक वर्षात हा बदल दिसणार आहे. विद्यार्थ्यांना आता भारतीय दृष्टिकोनातून आरोग्य, पोषण आणि पर्यावरण संतुलन समजेल. या बदलांचा उद्देश विद्यार्थ्यांना केवळ वैज्ञानिक ज्ञानाचीच नव्हे, तर शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या तत्त्वांशी ओळख करून देण्याचा उद्देश आहे. ''एनसीईआरटी''ने सहावीच्या विज्ञान विषयाच्या पाठ्यपुस्तकात आयुर्वेदाच्या गुणांची मूलभूत तत्त्वे समाविष्ट केली आहेत.
आठवीच्या पुस्तकात दिनचर्या आणि ऋतूनुसार शिस्त यासारख्या विषयांवर लक्ष केंद्रित करते. हा बदल केवळ पाठ्यपुस्तकांपुरता मर्यादित नाही, तर भारताच्या वैज्ञानिक परंपरा आणि आयुर्वेद वारसा जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करण्याची सुरवात आहे. शालेय स्तरावर आयुर्वेदाचा समावेश करण्याचा हा उपक्रम आहे. त्याचबरोबर उच्च शिक्षणातही आयुर्वेदाचा समावेश करण्यात येत आहे, असे ''एनसीईआरटी'' च्या संचालकांनी म्हटले आहे.

सहावीसाठी हा बदल
सहावीच्या अभ्यासक्रमात विज्ञानात आयुर्वेर्दाचे महत्त्व सांगण्याबरोबरच पदार्थांचे वर्गीकरण हे प्रकरण २० गुणांसाठी समाविष्ट आहे. यात आयुर्वेदाचा गुणधर्म, ऋतुनुसार उष्ण, थंड, हलके, जड अन्न याची तत्त्वे विद्यार्थ्यांना समजून सांगितली जातील. यामुळे त्यांना एकूण आरोग्याची मूलभूत समज होईल.

आठवीसाठी हा बदल
इयत्ता आठवीच्या वर्गात आयुर्वेद ः शरीर, मन आणि पर्यावरणाचे संतुलन या प्रकरणाद्वारे दिनचर्या (निरोगी दैनंदिनी सवयी), ऋतुचर्या (हंगामी आहार) आणि संतुलित जीवनशैलीचे महत्त्व शिकवले जाईल.
---
नवीन शैक्षणिक धोरणानुसार अनेक बदल शिक्षणात केले जात आहेत. त्यानुसारच बदल केले जात आहेत. आयुर्वेदाचा वापर पूर्वापार होत आला आहे. त्याचा समावेश केला आहे. हे योग्य आहे. विद्यार्थ्यासाठी हे उपयुक्त आहे.
- महेंद्र गणपुले, प्रवक्ता, मुख्याध्यापक संघ
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NZ beat SA in SF : दक्षिण आफ्रिका 'Chokers'! न्यूझीलंडचा T20 World Cup फायनलमध्ये प्रवेश, फिन'टॅस्टीक' शतक

T20 WC, SA vs NZ Semi: दक्षिण आफ्रिकेसोबत चिटिंग झाली? एडन मार्करमची विकेट ढापली? 'त्या' कॅचवरून वाद पेटला Video

मुंबईत २ लाख ट्रक चालक-मालक धडकणार, ई-चालान प्रणालीविरोधात उतरणार रस्त्यावर

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Pune Fraud : मेट्रोसाठी सिमेंट-स्टील पुरवठ्याच्या आमिषाने पावणे चार कोटींची फसवणूक

SCROLL FOR NEXT