पिंपरी-चिंचवड

प्रभाग क्रमांक २६ चा विकासाचा आराखडा जाहीर

CD

पिंपरी, ता. ९ : पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर पिंपळे निलख येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर परिसरात भव्य प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बोलताना माजी स्थायी समितीचे अध्यक्ष विलास नांदगुडे यांनी पिंपळे निलख व वाकड परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण विकासाचा आराखडा जाहीर केला.
नांदगुडे म्हणाले, ‘साई चौक ते औंध मिलिटरीकडे जाणारा शंभर फुटी रस्ता तयार करण्यात येणार असून, पिंपळे निलख ते बालेवाडी दरम्यान दोन नद्यांवर दोन नवीन पूल उभारले जाणार आहेत. मिलिटरीकडून स्टेडियमसाठी जागा घेण्याचा पाठपुरावा केला जाईल. पिंपळे निलख-वाकड परिसरात बालगंधर्वसारखे सुसज्ज नाट्यगृह उभारणार. पिंपळे निलख येथील भाजी मंडईचे आरक्षण विकसित करणे, बस टर्मिनलचा कायापालट करणे, विशालनगर येथील खेळाचे मैदान विकसित करणे, तसेच नदी सुधार प्रकल्पाला गती देणार आहे. लष्कराने घेतलेल्या जमिनींची नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी ठोस भूमिका घेणार आहे.’
या सभेला प्रभाग क्रमांक २६ चे अपक्ष उमेदवार शंतनू नांदगुडे, सगर पवार, मीरा कदम यांच्यासह माजी नगरसेविका सुजाता नांदगुडे, नितीन थोपटे, शशिकांत मोरे, अशोक बालवडकर, विकास जगदने, मनोज कांबळे, रवींद्र कांबळे, नारायण इंगवले आदी उपस्थित होते.
----
पिंपळे निलख : येथील जाहीर सभेत बोलताना माजी स्थायी समिती अध्यक्ष विलास नांदगुडे, शंतनू नांदगुडे, सगर पवार आदी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: देशात पहिल्यांदाच! ३२ वर्षीय तरुणासाठी सुप्रीम कोर्टाची इच्छामरणाला मंजुरी; काय आहे संपूर्ण प्रकरण?

शेतकऱ्याची जमीन हायवेत गेली, १.७७ कोटी मिळाले; पण १८ वर्षांच्या लेकानं गेमिंगमध्ये गमावले, फसवणूक झाल्यानं विष प्यायला

Gudi Padwa 2026 : गुढीपाडव्याला नवी गाडी घेताय? वाहन खरेदीसाठी अमृत वेळ, शुभ मुहूर्त, राशीनुसार योग्य रंग...सर्वकाही पाहा एका क्लिकवर

प्रसिद्ध मसाला ब्रँड वादाच्या भोवऱ्यात; चाचणीत ‘एंटरबॅक्टेरिएसी’ जिवाणू आढळल्याचा दावा, हा बॅक्टेरिया नेमका काय आणि आरोग्यासाठी किती धोकादायक?

Latest Marathi News Live Update : NCERT पुस्तकांच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT