पिंपरी-चिंचवड

निवडणुकीमुळे १५ जानेवारीला आरटीओला सार्वजनिक सुट्टी

CD

पिंपरी, ता. १० ः महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाला (आरटीओ) १५ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. शिकाऊ किंवा पक्क्या वाहनचालक परवाना चाचणीसाठी आगाऊ वेळ घेतलेल्या अर्जदारांनी शासकीय सुट्टीचे दिवस सोडून कोणत्याही दिवशी चाचणी देण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे या महानगरपालिकांच्या हद्दीतील नागरिकांना मतदानाचा सहज हक्क बजावता यावा म्हणून संबंधित त्या क्षेत्रातील शासकीय कार्यालये, खासगी आस्थापनांना सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, किंवा काही तासांसाठी मतदानासाठी अवधी उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश राज्य शासनाकडून पत्रकाद्वारे देण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर २९ महानगरपालिकांच्या हद्दीत येणाऱ्या प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना १५ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

अर्जदारांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध
१५ जानेवारीला शिकाऊ किंवा पक्क्या वाहनचालक परवाना चाचणीसाठी आगाऊ वेळ घेतलेल्या अर्जदारांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. संबंधित चाचणीधारकांना नव्याने ऑनलाइन आरक्षण करण्याची आवश्यकता नसून, शासकीय सुट्टीचे दिवस सोडून कोणत्याही दिवशी चाचणी देण्यासाठीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. संबंधित तारखेची आरक्षण पावती सोबत कार्यालयीन वेळेत चाचणीसाठी हजर राहावे. त्यामुळे मुभा दिलेल्या दिवसांत चाचणी द्यावी, असे आवाहन आरटीओ कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule: काँग्रेसचा ‘लाडकी बहीण’ द्वेषाचा क्रूर चेहरा उघड: चंद्रशेखर बावनकुळे; पैसे रोखण्यासाठी निवडणूक आयोगाला पत्र!

Diabetes Breathalyzer : डायबिटीज रुग्णांसाठी खुशखबर! ना रक्त-ना दुखणं...आता श्वासातून कळणार शरीरातली साखर, जाणून घ्या काय आहे ही मशीन?

Devendra Fadnavis : नाशिकच्या गोदाकाठी आज फडणवीसांची तोफ धडकणार; ठाकरे बंधूंना काय प्रत्युत्तर देणार?

H-1B Visa Fee Hike : अमेरिकेने एच-१ बी व्हिसा केला महाग, भारतीयांवर होणार थेट परिणाम, नेमंक काय घडलं?

SSC Paper Leak News: खळबळ! दहावी पूर्व परीक्षेचा पेपर फुटल्याची चर्चा?, समाज विज्ञानचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT