पिंपरी-चिंचवड

मतपेट्यांच्या वाहतुकीसाठी पीएमपीच्या १,०५६ बस

CD

सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १० ः पुणे आणि पिंपरी चिंचवड या महापालिकांच्या निवडणुकांसाठी मतपेट्यांचा वाहतूक करण्याकरिता पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे (पीएमपी) एक हजार ५६ बसची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार पीएमपीने या बस पुरविण्याचे नियोजन सुरू केले आहे.
विधानसभा, लोकसभा, महापालिकेच्या मतदानासाठी पीएमपीकडून मतपेट्या वाहून नेण्यासाठी प्रत्येक वेळी बस पुरविण्यात येतात. त्यासाठी निवडणूक नियोजन अधिकारी मतदार केंद्रानुसार पीएमपीकडे किती बस लागतील, याची माहिती देतात. त्यानुसार पीएमपीकडून मत पेट्या वाहून नेण्यासाठी मागणीनुसार बस पुरविल्या जातात. पुणे शहरात ४१ प्रभागातील १६५ जागांसाठी व पिंपरी चिंचवड शहरात ३२ प्रभागातील १२८ जागांसाठी एकाच टप्प्यात १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतपेट्या वाहून नेण्यासाठी पुण्यासाठी ६४२ आणि पिंपरी चिंचवडसाठी ४१४ पीएमपी बसची मागणी जिल्हा प्रशासनाने केली आहे. त्यानुसार या बसची देखभाल दुरुस्ती, नियोजन करण्यास पीएमपीकडून सुरवात करण्यात आली आहे.
---------------
दोन दिवस बस लागणार
पीएमपीकडून मतदानाच्या अगोदरच्या दिवशी म्हणजे १४ जानेवारी रोजी सकाळी मतपेट्या वाहून नेण्यासाठी बस संबंधित मुख्य केंद्रावर जातील. त्या ठिकाणाहून मतपेट्या घेऊन बस निघून त्यांना दिलेल्या केंद्रावर मतपेट्या पोहोचवल्या जातील. त्या मतपेट्या पोहचविल्यानंतर बस पुन्हा मार्गावर जातील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मतदान संपायच्या अगोदर एक तास म्हणजे १५ जानेवारी रोजी पाच वाजता पुन्हा या बस मतपेट्या गोळा करण्यासाठी त्यांना दिलेल्या केंद्रावर जातील. एखादी बस बंद पडली तर त्यासाठी राखीव बस देखील ठेवण्यात येणार आहेत.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Assembly Election : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का..? पारंपरिक विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष...

राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय! सात दिव्यांग शाळांतील विद्यार्थ्यांचे होणार समायोजन; दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांचे सीईओंना निर्देश..

Pune Crime: जागेच्या वादावरून दिराकडून सख्या भावजयीवर कोयत्याने सापासप वार; आंबेगाव तालुक्यात खळबळ, आधी दिली हाेती धमकी!

Numerology : 'या' 4 मूलांकाचे लोक असतात सगळ्यात जास्त घातक; तोंडावरून वाटतात साधेभोळे, पण कधी तुमचा काटा काढतील कळणारही नाही

Gas Price: महागाईच्या काळात दिलासा! गॅस दरात मोठी घसरण; नवे दर काय अन् कधीपासून लागू होणार? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT