पिंपरी-चिंचवड

एकनाथ शिंदे यांच्या सभेने शिवसेनेत उत्साह

CD

पिंपरी, ता. १० ः पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीतील शिवसेना पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ किवळेतील सभेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (ता. ९) लाइव्ह मार्गदर्शन केले. त्यामुळे शिवसेनेत उत्साहाचे वातावरण आहे. त्यांनी किवळे-रावेत-विकासनगर प्रभाग क्रमांक १६ मधील शिवसेनेचे उमेदवार बाळासाहेब ओव्हाळ, रेश्‍मा कातळे, ऐश्‍वर्या तरस, नीलेश तरस यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
या निवडणुकीतील शिवसेना पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ किवळेतील मुकाई चौकात सभा आयोजित केली होती. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांनीही प्रभावी शब्दांत सभेला संबोधित केले. या व्यासपीठावर खासदार श्रीरंग बारणे , उपनेते इरफान सय्यद, सुलभा उबाळे, जिल्हाप्रमुख राजेश खांडभोर, उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, पश्चिम महाराष्ट्र युवा सेना प्रमुख विश्‍वजित बारणे, जिल्हा संघटक बाळासाहेब वाल्हेकर, शहरप्रमुख नीलेश तरस, जिल्हा संघटिका शीला भोंडवे, महानगरप्रमुख राजेश वाबळे आदि उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘पिंपरी चिंचवडमध्ये भगव्या विचारांचे वादळ निर्माण झाले आहे. या भूमीत शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत आल्याशिवाय राहणार नाही. ही हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे. त्यांच्या विचारांशी तडजोड होणार नाही.’’
दरम्यान, प्रचारार्थ सभेला नागरिक, महिला आणि युवकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपकडून पैशांच्या पाकिटांचं वाटप, शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडलं; VIDEO आला समोर

'काका, पास घरी राहिलाय; बाबांना फोन करा ते पैसे देतील'! पाचवीतील मुलाची विनंती, तरीही बस कंडक्टर महामार्गावर उतरवलं, नंतर...

BMC Election: निवडणूक प्रक्रियेवर १०५ ड्रोनद्वारे नजर, संवेदनशील प्रभागांवर २४ तास लक्ष

IND vs NZ, Video: हर्षित राणाच्या 'गेम चेंजर' विकेट्स! भारताविरुद्ध विक्रमी भागीदारी करणाऱ्या सलामीवीरांना पाहा कसं केलं आऊट

Bigg Boss Marathi 6 Live Update: किती दिवस असणार 'बिग बॉस मराठी ६' चा हा सिझन? सतीश राजवाडे म्हणाले-

SCROLL FOR NEXT