पिंपरी-चिंचवड

आमदार अमित गोरखे यांनी मांडले पिंपरी चिंचवडचे विकास व्हीजन

CD

पिंपरी, ता. १० : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आकुर्डी येथे भव्य सभा पार पडली. या सभेत बोलताना आमदार अमित गोरखे यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतला आणि भारतीय जनता पक्षाचे पिंपरी चिंचवडसाठीचे स्पष्ट विकासदृष्टीकोन (व्हीजन) व गेल्या काळात केलेल्या कामकाजाचा सविस्तर आढावा उपस्थितांसमोर मांडला.
आमदार गोरखे म्हणाले की, ‘संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा पहिला मुक्काम ज्या पवित्र स्थळी होतो, त्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांच्या जीवन व विचारांवर आधारित भव्य थीम पार्क उभारण्याचा संकल्प भाजप सरकारने केला आहे. पीएमआरडीएचा अन्यायकारक डीपी आराखडा रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय फडणवीस सरकारने घेतला. आकुर्डीकरांचा गेली १० ते १५ वर्षे प्रलंबित असलेला साडेबारा टक्के परताव्याचा प्रश्न मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेऊन मार्गी लावला आहे. भामा आसखेड पाणीपुरवठा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे.’

आमदार गोरखे म्हणाले...
- मेट्रो प्रकल्प निगडीपर्यंत नेण्यासाठी तरतूद करण्यात आली.
- पिंपरी चिंचवडसाठी १८० कोटी रुपयांचा पोलिस उपायुक्त कार्यालयाचा भव्य प्रकल्प मंजूर केला.
- वायसीएम रुग्णालयाला पीजी इन्स्टिट्यूटचा दर्जा देण्यात आला.
- महाराष्ट्रातील एकमेव दिव्यांग भवन पिंपरी चिंचवडमध्ये सुरू करण्यात आले.
---
आधुनिक, सक्षम आणि संवेदनशील शहर बनवण्याचा संकल्प

गोरखे यांनी शहराच्या भविष्यासाठी स्पष्ट, लोकाभिमुख आणि विकासकेंद्रित व्हीजन मांडला. “एक शहर-एक मतदारसंघ” या संकल्पनेतून सुशासन, पारदर्शक प्रशासन आणि नागरिकांचा थेट सहभाग हे भाजपचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. शिवनेरी जिल्हा व सरकारी कार्यालयांचे विकेंद्रीकरण, एकात्मिक प्रशासकीय केंद्र, कल्याणकारी योजनांसाठी स्वतंत्र टास्क फोर्स, स्मार्ट सिटी प्रशासन, स्मार्ट फॅमिली अ‍ॅप, तसेच आरोग्य व स्वच्छतेवर विशेष भर देत पिंपरी चिंचवडला आधुनिक, सक्षम आणि संवेदनशील शहर बनवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. विकास म्हणजे केवळ पायाभूत सुविधा नव्हे, तर नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवणे, हेच भाजपच्या विकास मॉडेलचे वैशिष्ट्य असल्याचे आमदार गोरखे यांनी ठामपणे नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Employees DA: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्राच्या बरोबरीने महागाई भत्ता मिळणार; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय

Latest Marathi News Live Update : जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीचे भविष्य उद्या सुप्रीम कोर्टात ठरणार

Solapur News: राज्यातील जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीचे भविष्य उद्या सुप्रीम कोर्टात ठरणार; राज्य निवडणूक आयोगाकडून मुदतवाढीची विनंती !

पतीनं पत्नीकडून पैशाच्या खर्चाचा हिशोब मागणं गुन्हा ठरतो का? महत्त्वाचा निर्णय देत सर्वोच्च न्यायालयानं दिलं उत्तर

Thane News: डोंबिवलीत मनसेला मोठा धक्का! बड्या नेत्याचा भाजपात प्रवेश, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT