पिंपरी-चिंचवड

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची जुगलबंदी

CD

पिंपरी, ता. ११ : महापालिका निवडणुकीसाठी रविवारची (ता. ११) सार्वजनिक सुटी ‘प्रचारवार’ ठरली. अपक्षांसह सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी पदयात्रा, वाहनफेरी काढून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघातील प्रभागांमध्ये ‘रोड शो’ करून माध्यमांशी संवाद साधला. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करून भोसरी विधानसभा मतदारसंघातील प्रभागांमध्ये कोपरा सभा घेतल्या. त्यामुळे शहरात मुख्यमंत्री विरुद्ध उपमुख्यमंत्री अशी जुगलबंदी बघायला मिळाली.

महापालिकेच्या ३२ प्रभागांतील १२८ जागांसाठी अपक्षांसह ६९१ उमेदवार रिंगणात आहेत. त्यातील सर्वच जागांवर भाजपने उमेदवार उभे केले आहेत. त्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (रिपाइं) पाच उमेदवार भाजपच्या चिन्हावर तर ‘ए-बी फॉर्म’ उशिरा पोहोचल्याने अपक्ष ठरलेल्या तीन उमेदवारांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी आघाडी केली आहे. त्यांचे अनुक्रमे ११९ व १० जागांवर उमेदवार रिंगणारत आहेत. याशिवाय शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आम आदमी पक्ष, बहुजन समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडी, नॅशनॅलिस्ट रिपब्लिकन पक्ष, पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडी, सनय छत्रपती शासन पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, स्वराज्य शक्ती सेना, वेलफेअर पार्टी ऑफ इंडिया, रिपब्लिकन सेना, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), बहुजन भारत पार्टी, प्रहार जनशक्ती पक्ष, हिंदूराष्ट्र संघ यांच्यासह अपक्ष उमेदवारही निवडणूक रिंगणात आहेत.
दरम्यान, या निवडणूक प्रक्रियेत गुरुवारी (ता. १५) मतदान आहे. त्यामुळे मंगळवारी (ता.१३) सायंकाळी प्रचार थांबणार आहे. त्यामुळे प्रचारासाठी अवघे तीन दिवस शिल्लक आहेत. त्यातही सुटीचा रविवार एकमेव असल्याने अनेक मतदार घरी भेटणार असल्याने अपक्षांसह सर्वच उमेदवारांनी रोड शो, पदयात्रा, घरभेटी, कोपरा सभा, वाहन फेरी काढून प्रचारावर भर दिला. अनेकांनी ऑटोरिक्षा व सायकल रिक्षांवर प्रचार फलक लावून आणि ध्वनिक्षेपकाद्वारे उद्‍घोषणा करीत प्रचार केला. त्यामुळे शहरातील प्रत्येक प्रभागात व रस्तारस्ती प्रचाराची रणधुमाळी दिसून आला. घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. प्रचारामध्ये युवक, महिलांचा समावेश अधिक होता. बहुतांश प्रमुख उमेदवारांनी शक्ती प्रदर्शनावर भर दिला. विशेषतः गृहनिर्माण सोसायट्यांतील मतदारांपर्यंत पोहोचण्यावर अनेकांचा भर दिसून आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas: उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आलोय, मला सिलिंडर द्या...; अधिकारी असल्याचे भासवले; एजन्सीमधून सिलिंडर घेऊन पळून गेले

Truck Eicher Accident : भरधाव ट्रकची आशरला पाठीमागून धडक; भिषण अपघातात दोघांचा मृत्यू, ८ शेळ्या दगावल्या

फक्त ३३ किमी रुंद असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजे कशी जातात?

आश्रमशाळांना युद्धाची झळ, गॅस तुटवड्याचा १८ हजार विद्यार्थ्यांना फटका; भोजन व्यवस्थेसमोर मोठे संकट

नाना पाटेकर ते नसीरुद्दीन शाह, एमएक्स प्लेयरवर २०२६ मध्ये येणार १५० नवीन शो; सगळे पाहता येणार फ्री

SCROLL FOR NEXT