पिंपरी-चिंचवड

हलव्याचे दागिने, पतंग, तिळगुळाने बाजारपेठ सजली

CD

पिंपरी, ता. ११ : ‘तिळगूळ घ्या गोड गोड बोला’ असे म्हणत परस्परातील स्नेह वृद्धिंगत करण्याचा, लहान बालकांचे व नवविवाहितांचे कौडकौतुकाचा करण्याचा वर्षातील पहिला सण म्हणजे ‘मकर संक्रांत’. या सणाला या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. हा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. त्यामुळे शहरातील बाजारपेठांमध्ये संक्रांतीसाठी आवश्‍यक असणाऱ्या वस्तू खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. हलव्याचे दागिने, हलवा, तिळगुळाचे लाडू, पतंग, सजावटीचे साहित्य, वाण लुटायच्या वस्तू बाजारपेठांमध्ये दाखल झालेल्या आहेत.

बोरन्हाणाचे साहित्य घेण्यासाठी गर्दी
संक्रातीनंतरचा दुसरा दिवस म्हणजे किंक्रांत. या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत लहान मुलांना बोरन्हाण घातले जाते. हिवाळ्यात शेतातून भाज्या, धनधान्य, फळे यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर होते. याचे सेवन मुलांनी करावे यासाठी हे बोरन्हाण घालण्याची पद्धत आहे. तसेच हौस म्हणून सजावटही केली जाते. या सजावटीच्या साहित्याने सध्या बाजारपेठा सजल्या आहेत. यामध्ये बोरन्हाणाचे कटआऊट, पतंग, कृष्ण, राधा यांच्या प्रतिमा असणाऱ्या पतंगाच्या माळा, फुलांच्या माळा याची खरेदी केली जात आहे. पतंगांच्या माळांची किंमत पन्नास रुपयांपासून पुढे आहे. तर पुठ्ठ्याच्या कटआऊटची किंमत १०० रुपयांपासून पुढे आहे. बोरन्हाणासाठी बोरे, ऊस यासोबत विविध बिस्किट, चॉकलेट यांचीही खरेदी केली जात आहे.

हलव्याचे दागिने तयार करून घेण्याकडे कल
बोरन्हाणासाठी लहान मुलांना हलव्याचे दागिने घातले जातात. त्यामध्येही मुलांसाठी कृष्ण सेट व मुलींसाठी ‘राधासेट’ या प्रकारात हलव्याचे दागिने पाहायला मिळत आहेत. तर नवविवाहित महिलांसाठी गुलाब सेट, मोगरा सेट, वेलवेट सेट, मेखला सेट, राणीहार यासारखे असंख्य प्रकार हलव्याच्या दागिन्यांमध्ये पाहायला मिळत आहेत. यांची किंमत ३५० रुपयांपासून ते २००० रुपयांपर्यंत आहे. याशिवाय ‘कस्टमाइज’ दागिने बनविण्याकडे महिलांचा कल वाढल्याने घाऊक बाजारातून खास दागिन्यांसाठी हलवा विकत घेण्याकडे प्रमाण वाढले आहे. ‘कस्टमाइज’ दागिन्यांमध्ये बांगड्या आणि लटकण, झुमके, राणीहार, मेखला, बाजूबंद या दागिन्यांना अधिक मागणी आहे. हे दागिने बनवून घेण्यासाठी वेळ लागत असल्याने आठ ते दहा दिवस आधीच याची ‘ऑर्डर’ दिली जात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

वाण खरेदीसाठी गर्दी
मकर संक्रांतीच्या दिवशी विविध भाज्या व फळे घालून सुगड पूजा केली जाते. त्यानंतर काही भागांमध्ये महिला विडे घेतात. तसेच एकमेकींच्या घरी हळदी-कुंकू करून वाणही देतात. संक्रांतीपासून सरू होणारे हे हळदी-कुंकू व वाण लुटण्याचा मुहूर्त रथसप्तमीपर्यंत असतो. त्यामुळे वाणखरेदीसाठी महिलांनी बाजारात गर्दी केली होती. रविवार आणि दोन दिवसांवर आलेली संक्रांत यामुळे शहरातील पिंपरी, चिंचवड, आकुर्डी या मध्यवर्ती भागांसह उपनगरांमधील सर्वच बाजारपेठांमध्ये गर्दी केली होती. घरगुती गरजेच्या वस्तूंसोबतच फ्रीज मॅग्नेट, मसाले, पर्स, शोभेचे दिवे, इमिटेशन ज्वेलरी, तयार रांगोळी, पूजेची थाळी यांची खरेदी केली जात आहे. ऑनलाइन बाजारातूनही वाण खरेदी करण्याकडे महिलांचा कल वाढला आहे.

बोरन्हान व हळदी कुंकूसाठी आवश्‍यक साहित्यामध्ये दरवर्षी नवीन व्हरायटी येते. गेल्यावर्षीपासून पतंगांच्या माळांना मागणी वाढत आहे. यावर्षी तयार दागिन्यांसोबतच आम्ही दागिने तयार करण्याचे साहित्यही विक्रीस ठेवले आहे. तयार दागिन्यांमध्ये १६ प्रकारचे संच उपलब्ध आहेत.
- वीरचंद बागमार, विक्रेता, चिंचवड

हलव्यांच्या तयार दागिन्यांच्या संचामध्ये ठराविक दागिनेच असतात. त्यामुळे मी माझ्या मुलीसाठी दरवर्षी दागिने घरीच तयार करते. तसेच सजावटही घरी करते. त्याचे साहित्य घेण्यासाठी मी आले होते.
- नेहा, गृहिणी


PNE26V84405

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT